Numerology : ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहाचे वर्णन केले आहे. तसेच या ग्रहांचा संबंध कोणत्या ना कोणत्या अंकाबरोबर असतो. आज आपण शनि ग्रहाशी संबंधित अंकाविषयी जाणून घेणा)र आहोत. शनिदेवाशी संबंधित अंक आहे ८. ज्या लोकांचा जन्म ८, १७ आणि २६ तारखेला झाला त्यांचा मूलांक ८ असतो. मूलांकला अंकशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीच्या मूलांकवरून आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेणार आहोत.
ज्या लोकांवर मूलांक ८ चा प्रभाव असतो ते लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच आयुष्यात खूप धन संपत्ती कमावतात. जाणून घेऊ या मूलांक ८ शी संबंधित माहिती. (numerology people who born on these dates earned money by shanis grace they believe in karma rather than luck

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात लोक

अंकशास्त्रानुसार जे लोक ८ अंकाशी जुळलेले असतात ते लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच हे लोक जीवनात खूप श्रीमंत असतात. हे लोक मेहनतीने खूप धन कमावतात. तसेच या लोकांचे नशीब वयाच्या ३० व्या वर्षानंतर चमकते. या मुलांकशी संबंधित लोक भौतिक सुखाचा जास्त आनंद घेऊ शकत नाही. या लोकांना साधे जीवन जगायला आवडते. जेव्हा या लोकांचा कोणाबरोबर वाद होतो तेव्हा विषय खूप गंभीर होतो.

स्वतंत्र राहायला आवडते

अंक शास्त्रानुसार, मूलांक ८ शी संबधित लोकांना स्वतंत्र राहायला आवडते. या लोकांना कुणाची खोटी प्रशंसा करायला आवडत नाही. हे लोक आपल्या शक्तीचा खूप कमी उपयोग करतात. हे लोक स्वभावाने खूप शांत असतात. त्यांना जर राग आला तर ते कोणाचेही ऐकत नाही. या लोकांनी कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.

या क्षेत्रामध्ये मिळतात भरपूर यश

मूलांक ८ शी संबंधित लोक व्यवसाय करत असेल तर त्यांना लाभ मिळू शकतो. जर हे लोक नोकरी करत असेल तर इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, तेल, पेट्रोल पंप, रियल इस्टेट, कंस्ट्रक्शनशी संबंधिक करिअर निवडू शकतात. या लोकांना चांगले यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)