Numerology : अंकशास्त्रामध्ये आकड्यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा वेगवेगळा असतो. व्यक्तीच्या मूलांकवरून त्यांच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी आपण अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो. आज आपण मूलांक ८ असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक ८ असतो. या लोकांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते, याविषयी जाणून घेऊ या. (Numerology: Introverts Born on These Dates Will Achieve Wealth and Success – Check Your Mulank)
- मूलांक ८ असलेले लोक अंतर्मुख (इंट्रोवर्ट) असतात. त्यांना आत्मनिरीक्षण करायला आवडते. त्यांना एकटे राहायला आवडते. ते लाजाळू, पण तितकेच संवेदनशील आणि विचारशील असतात.
हेही वाचा : वर्षाअखेरीस शुक्र-शनीची होणार युती! नवीन वर्ष २०२५मध्ये ‘या’ राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ, करिअरमध्ये घेणार मोठी झेप
- मूलांक ८ असलेल्या लोकांना सहज कोणतेही यश प्राप्त होत नाही. खूप संघर्ष आणि मेहनत केल्यानंतर या लोकांना यश मिळते. अडचणी आल्यामुळे ते निराश होत नाही. ते शांतपणे आणि संयमाने प्रत्येक गोष्टी हाताळतात.
- मूलांक ८ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शनि असतो. या लोकांना कठीण मेहनत घेतल्यानंतरच यश प्राप्त होते. ते ज्या क्षेत्रात करिअर बनविण्याचा विचार करतात, त्या क्षेत्रात प्रगती करतात. वेळेनुसार ते श्रीमंत सुद्धा बनतात. ते कोणताही खर्च खूप विचारपूर्वक करतात. त्याच कारणामुळे ते भरपूर पैसा वाचवतात. त्यांचे आर्थिक गणित चांगले असते.
- या लोकांचे त्यांच्या कुटुंबाबरोबर फार पटत नाही. ते कामापर्यंत मर्यादित नातेसंबंध टिकवतात. हे लोक कोणाबरोबरही मैत्री सुद्धा लवकर करत नाही. त्यांचे कोणावर प्रेम असेल तर ते व्यक्त होताना कचरतात. या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात प्रेमाची कमतरता भासते.
- या मूलांकचे लोक राजकारण, आरोग्य, इत्यादी क्षेत्रात प्रगती करतात. या लोकांना ग्रहांची योग्य साथ मिळाली नाही तर हे लोक मेहनत घेऊन त्यांचे आयु्ष्य जगतात.
- हे लोक कोणाबरोबर अन्याय करत नाही आणि त्यांच्याबरोबर झालेला अन्याय ते सहन करत नाही. ते अन्यायाच्या विरोधात नेहमी आवाज उठवतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)