Numerology : अनेक पुराण आणि शास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनातील रहस्याविषयी सांगितले आहे. यातील एक म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रानुसार कोणत्याही अंकानुसार व्यक्तिच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याविषयी आज आपण जाणू शकतो. व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्ही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेऊ शकता. ज्यांचे नाव ‘N’ अक्षरापासून सुरू होते, त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते आणि ते जीवनात किती यश प्राप्त करू शकतात, आज आपण जाणून घेणार आहोत. (Numerology people whose name starts with the N letter read Personality traits)
संख्याशास्त्रामध्ये ‘N’ अक्षराचा संबंध वृश्चिक राशीशी मानला जातो. या राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहे. वृश्चिक राशीचे लोक खूप विद्वान आणि भावुक स्वभावाचे असतात. ते समस्यांपासून घाबरत नाही तर त्याचा सामना करतात आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये काहीतरी हटके गोष्टी करण्याची इच्छा शक्ती असते.
बुध करतात ५ अंकाला नियंत्रित
Numerology मध्ये ‘N’ अक्षराचा संबंध ५ शी असतो. ग्रहांचे राजकुमार बुध या संख्येला नियंत्रित करतात. त्यांना बुद्धी, संचार आणि विरुद्ध परिस्थितीमध्ये आपल्या पक्षामध्ये टिकवून राहण्याची क्षमता असते. असे लोक कोणत्याही गोष्टीला घेऊन खूप लवकर शिकतात आणि आपल्या भावनांना खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यात अग्रेसर असतात. हे लोक अतिशय बुद्धिमान असतात आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करतात. यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते खूप चांगल्याप्रकारे मोठी आव्हाने स्वीकारतात.
दृढ निश्चयी असतात हे लोक
ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षर ‘N’ चा संबंध अनुराधा नक्षत्राशी मानला जातो. स्वभावाचे शनि देव या नक्षत्राचे शासक ग्रह असतात. ज्या लोकांचा जन्म या नक्षत्रामध्ये असतो, ते दृढ निश्चयी, चुकीच्या गोष्टीपुढे न झुकणारे आणि लक्ष्य प्राप्ती साठी लढणारे लोक असतात. कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते टारगेट पूर्ण करतात. ते अतिशय महत्त्वकांक्षी असतात. कोणतेही कार्य ते खूप मनापासून करतात आणि मेहनतीने करतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)