अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्म तारखेवरून कळू शकते. १ ते ९ पर्यंत एकूण नऊ मूलांक आहेत. आता आपणज्या लोकांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ आहे. त्या लोकांविषयी जाणून घेऊया. त्यांचा मूलांक ५ आहे. हा मुलांक असलेल्या लोकांचा स्वामी बुध ग्रह असतो. ज्योतिष शास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता आणि मेहनती असतात. या राशीचे लोक बुद्धिमान आणि मेहनती असतात. हे लोक कधीही हार मानत नाही. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात.
या मूलांकच्या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक रस असतो आणि ते लोक व्यवसायातही भरपूर नफा कमावतात. त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करायला आवडते. त्यांच्या कामात कोणाची ढवळाढवळ त्यांना आवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने करायला आवडते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ असतो. ते कोणालाही आपल्या बाजूला त्वरित आकर्षित करतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो.
आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video
या मूलांकाचे लोक प्रतिभावान असतात. ते धाडसी, निर्भयी आणि मेहनती असतात. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जाण्यास तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी नेहमी तयार असतात. ते संभाषण करण्यात पटाईत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते.
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)