आपल्या जीवनात अंकांना खूप महत्त्व आहे. काही अंक आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात हे तुम्ही पाहिलेच असेल. दुसरीकडे, अंकशास्त्रात, १ ते ९ पर्यंतच्या संख्येचे वर्णन आढळते आणि या ९ अंकांवर देखील काही ग्रहांचे राज्य असते. येथे आपण ८ या अंकाबद्दल बोलणार आहोत. ज्याचा स्वामी शनिदेव आहे. याउलट, ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला होतो, अशा लोकांची मूलांक ८ होते. हे लोक आपल्या मेहनतीतून पैसे कमावण्यावर विश्वास ठेवतात. कारण त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे. यासोबतच हे लोक रहस्यमय स्वभावाचेही मानले जातात. चला जाणून घेऊया मूलांक ८ बद्दल सविस्तर …
करतात कठोर परिश्रम
मूलांक क्रमांक ८ असलेले लोक मेहनती असतात आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करतात. हे लोक भावनिकही असतात. त्यांना कोणी काही सांगितले तर ते तासनतास विचार करत राहतात. त्याच वेळी, ते कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच शांत बसतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र, आयुष्यात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात. हे लोक अतिशय गंभीर आणि शांत स्वभावाचे असतात. कोणतेही काम निष्ठेने करतात. तसेच हे लोक संपत्ती जोडण्यातही पटाईत असतात. यासोबतच या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.
(हे ही वाचा: Astrology: एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! नोकरी आणि आर्थिक परिस्थितीत होईल बढती)
‘या’ व्यवसायात मिळते यश
अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक ८ असलेल्या लोकांनी तेल, लोह, वाहतूक आणि पेट्रोलियमशी संबंधित व्यवसाय केल्यास विशेष लाभ होऊ शकतो. तसेच करिअरच्या अनुषंगाने या लोकांना अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये यश मिळते. हे लोक संशोधनाचे कामही चांगले करतात.
(हे ही वाचा: Astrology: एप्रिलमध्ये ‘या’ राशीच्या लोकांचे चमकेल नशीब! नोकरी आणि आर्थिक परिस्थितीत होईल बढती)
‘हे’ दिवस आणि तारखा आहेत शुभ
या मूलांक असलेल्या लोकांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी नसतात, काहीवेळा ते त्यांच्या मनात प्रेम निर्माण करत राहतात आणि ते व्यक्त करू शकत नाहीत. अनेकदा ते उशिरा लग्न करतात. त्यांचे त्यांच्या जोडीदाराशीही मतभेद असतात. या लोकांना त्यांच्या आयुष्यात समाजात खूप मान मिळत असला तरी. पण वैवाहिक जीवनाच्या बाबतीत ते थोडे अशुभ राहतात. ८, १७ आणि २६ तारखी तुमच्यासाठी शुभ आहेत. दिवसांबद्दल बोलायचे तर बुधवार, शुक्रवार, सोमवार आणि गुरुवार तुमच्यासाठी शुभ आहेत. यासोबतच गडद तपकिरी, काळा आणि निळा रंग तुमच्यासाठी अनुकूल आहेत.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)