Numerology Predictions 2024: संख्याशास्त्रात शून्याला फार महत्व आहे. जेव्हा जेव्हा संपूर्ण तारखेत शून्य अधिकवेळा येते तेव्हा ती तारीख क्रांतीकारक ठरते. इतकेच नव्हे तर ज्या अंकाच्या मागे शून्य येते त्या अंकाच्या सद्गुणांची बऱ्याच प्रमाणात वाढ दिसून येते. तर हळव्या अंकामागे उभे राहणारे शून्य दु:खाचे डोंगर उभे करते.
यावर्षी नवीन येणारे २०२४ हे साल २०२० प्रमाणेच क्रांतीकारी ठरणार आहे. २०२० मधील शून्य किती महाभयंकर घटना घडवू शकते याचं प्रत्यंतर आपण प्रत्यक्षपणे अनुभवले. तसेच दोन आणि शून्याच्या संयोगातून निर्माण होणारी प्रतिक्रिया उलट्या गतीने किती टोकाची स्फोटक असू शकते, तेही अनुभवले. संपूर्ण मानव जातीचे आरोग्य उद्धवस्त करण्याचे काम २०२० या वर्षात झाले. असाच करोनासारखा प्रकार काहीसा सौम्य प्रमाणात यावर्षी दिसून येईल. २०२४ मध्ये दोन हा अंक दोन वेळा आला आहे. त्याचबरोबर शून्य आणि चार म्हणजे हर्षलचे अस्तित्व खूपसे प्रक्षोभक दाहक ठरणार आहे.
२०२४ म्हणजे २+०+२+४ = ८ हा अंक शनी ग्रहाचा. या अंकावर शनीचा अंमल असतो. शनी हा सत्यवचनी, कठोर न्यायी वृत्तीचा असल्यामुळे या देशातील न्याय व्यवस्था चोख ठेवण्याचे काम शनी उत्तमपणे पार पाडील. त्यामुळे गुन्हेगारी, ढोंगी नेतृत्व करून लुबाडणाऱ्या नेत्यांना मोठा दणका बसेल व निश्चितपणे जनतेला एक मोठा सुखद धक्का मिळेल.
हे ही वाचा<< ‘या’ ५ राशी जानेवारीत सर्वात श्रीमंत ठरणार; ५० वर्षांनी दुर्मिळ राजयोग बनल्याने नशिबात येईल तिळगुळाचा गोडवा
जसा माणसाच्या मनाचा उद्रेक असतो असाच निसर्गाचा उद्रेक अतिवृष्टी, महापूर आणि भूकंप यातून दिसून येईल. यात माणसांनी आपली मानसिक स्थिती, शारिरीक स्थिती सांभाळून जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यातून आपण सहज स्वत:ला सावरू शकू.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)