Numerology Predictions: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे विश्लेषण केले जाते आणि परिणाम केले जातात. त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही गुणांच्या आधारे विश्लेषण केले जाते. तुमच्या जीवनात संख्यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अंकांना विशेष महत्त्व असते. आयुष्यात काही अंक भाग्यवान ठरत असतात तर काही अशुभ. अंकशास्त्रात १ ते ९ हे अंक आढळून येतात. हे अंक एक किंवा दुसऱ्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात. व्यक्तीच्या आयुष्यात अंकशास्त्राला ही देखील विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रावर ही व्यक्तीचं भविष्य ठरलेलं असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मतारीख आणि वेळेवरून व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य सांगता येते. त्याचप्रमाणे अंकशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव रागीट असतो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला होतो, त्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो. मूलांक नऊचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ हा युद्धाचा देवता आहे आणि यामुळेच त्याचा परिणाम या क्रमांकाच्या लोकांवर बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. या तारखांना जन्मलेले लोकं पूर्णपणे भिन्न आहेत. अंकशास्त्रातील ९ मूलांकाच्या स्वभावाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘या’ लोकांवर मंगळाचा प्रभाव

अंकशास्त्रानुसार ९ क्रमांकाच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळाच्या वर्चस्वामुळे नवव्या मूलांकाचे लोक खूप धाडसी असतात. या राशीचे लोक स्वभावाने अतिशय निर्भय आणि धाडसी असतात. हे गुण त्यांच्यामध्ये मंगळाच्या प्रभावामुळे असतात. या लोकांच्या आत आत्मविश्वास भरलेला असतो. ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. जोखमीला अजिबात घाबरत नाहीत.

(हे ही वाचा : पुढील वर्षाच्या सुरुवातीला ‘शुभ योग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होतील गडगंज श्रीमंत? २०२४ मध्ये मिळू शकते प्रचंड धनलाभाची संधी)

या लोकांना शिस्त पाळायला आवडते. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तर ते धैर्याने सामोरे जातात या विशेष गुणांमुळेच हे लोकं आपल्या आयुष्यात वेगाने पुढे जातात आणि कधीच मागे वळून पाहत नाहीत. हे लोकं कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात. 

मूलांक ९ असलेली व्यक्ती संरक्षण क्षेत्रात, राजकारणात, व्यवस्थापन क्षेत्रात, एखाद्या ठिकाणी नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा, आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात. पण सुरुवातीला त्यांना त्यांच्या क्षेत्रात खूप गोष्टींचा सामना करावा लागतो आणि तेव्हाच त्यांना यश मिळते. त्यांच्यावर मंगळाच्या कृपेचा वर्षाव होतो. हे लोकं कमी वेळेत पैसे कमावण्याची संधी शोधत असतात आणि यशस्वीही होतात. या लोकांचा स्वभाव अतिशय क्रोधित असतो. त्यांना इतका राग येतो की ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे) 

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology predictions people born on this date are very angry by birth astrology news pdb