Numerology : अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्माची तारीख खूप महत्त्वाची असते. जन्म तारीख व्यक्तीच्या जीवनाविषयी आणि करिअरविषयी अनेक गोष्टी सांगते. तसेच काही अकं आपल्यासाठी लकी असतात तर काही अनलकी असतात. आज आपण मूलांक ८ विषयी जाणून घेणार आहोत ज्याचा संबंध थेट न्यायाधीश शनिदेवाशी येतो. म्हणजेच ज्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या ८, १७, आणि २६ तारखेला असतो, त्यांचा मूलांक ८ असतो.
ज्या लोकांवर मूलांक ८ चा प्रभाव असतो त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा दिसून येते. हे लोक अतिशय मेहनती आणि चांगले कर्म करणारे असतात. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. मूलांक ८ शी संबंधित माहिती जाणून घेऊ या. (Numerology Shani Dev blessing people born on these dates get money and Position and Prestige by shani dev’s grace)
साधे जीवन आणि उच्च विचार
मूलांक ८ असणाऱ्या लोकांवर शनिदेवाची विशेष आशीर्वाद दिसून येतो. तसेच हे लोक खूप जास्त मेहनती आणि चांगले कर्म करणारे असतात. या लोकांजवळ खूप जास्त धन संपत्ती असते. या लोकांना बालपणी खूप कमी सुख प्राप्त होते. तसेच या लोकांचे नशीब वयाच्या ३० व्या वर्षानंतर चमकते. म्हणजेच हे लोक नेहमी साधे जीवन आणि उच्च विचारांनी जगतात.
आपल्या मनाप्रमाणे काम करायला आवडते
मूलांक ८ शी संबंधित लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला आवडते. या लोकांना आळशीपणा आवडत नाही. या लोकांना खोटी स्तुती करणारे आवडत नाही आणि हे लोक सुद्धा कोणाची खोटी स्तुती करत नाही. हे लोक त्यांच्या शक्तीचा कमी वापर करतात. मूलांक ८ असणाऱ्या लोकांना खूप व्यवस्थितरित्या गोष्टी हाताळणे आवडते. त्यांना वस्तू पसरलेल्या आवडत नाही. ते लोक खूप व्यवसायी असतात. ते लोक कधी कधी खूप आस्थावादी असतात तर कधी कधी ते अनास्थावादी सुद्धा असतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)