मूलांक २ असलेल्या लोकांना या आठवड्यात अडकलेले पैसे मिळल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. तसेच मूलांक ४ च्या लोकांना आता खर्चातून दिलासा मिळणार आहे. येणार आठवडा मूलांक १ ते ९ च्या लोकांसाठी कसा ठरणार आहे जाणून घेऊया.
मूलांक १ : या आठवड्यात तुमच्या योजना शेवटच्या क्षणापर्यंत प्रलंबित राहणार असल्याचे दिसते. संशयामुळे प्रेमसंबंधात अडचणी येतील. सरकारी कामात श्रमाचे फायदे मिळतील. पोटाचा त्रास होईल.
शुभ रंग: केसरी. शुभ अंक : ३
जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ
मूलांक २: गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल नाही. कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी खोलवर विचार करणे चांगले. रखडलेले पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक सहकार्य मिळेल.
शुभ रंग : खाकी/तपकिरी. शुभ अंक : ५
मूलांक ३ : या आठवड्यात प्रवास आणि धावपळ होईल. जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते. जास्त खर्चामुळे आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. वीकेंडमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवाल.
शुभ रंग : नारंगी. शुभ अंक : १
सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत
मूलांक ४ : या आठवड्यात खर्च जास्त होईल, परंतु तुम्हाला जुन्या चिंतांपासून मुक्ती मिळेल. पालकांकडून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून डेटा चोरी गेल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
शुभ रंग : निळा. शुभ अंक : ७
मूलांक ५ : या आठवड्यात कार्यक्षेत्रात काही विशेष आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिक सहलींद्वारे किंवा परदेशातूनही तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवला जाईल, परंतु कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे योग्य राहील.
शुभ रंग : पांढरा. शुभ अंक : २
तुम्हालाही उंचावरून पडण्याचे स्वप्न पडते का? जाणून घ्या यामागचा अर्थ काय
मूलांक ६ : या आठवड्यात तुम्हाला प्रेमसंबंधात नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी जास्त खर्च आणि कामात व्यत्यय यांमुळे मन चिंतेत राहील. भावनिक समस्यांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल टाळणे या आठवड्यात चांगले राहील.
शुभ रंग : गडद जांभळा. शुभ अंक : ९
मूलांक ७ : या आठवड्यात वैवाहिक जीवनात नवीनता येईल आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर प्रिय व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात विशेष यश मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे.
शुभ रंग : गुलाबी. शुभ अंक : १५
मूलांक ८ : या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल, परंतु सहकाऱ्यांशी सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सरकारकडून लाभ मिळतील किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल.
शुभ रंग : लाल. शुभ अंक : २१
मूलांक ९ : या आठवड्यात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनातील कलह मनाला अस्वस्थ करेल. अचानक आर्थिक लाभ होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
शुभ रंग : काळा. शुभ अंक : २
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)