Budh Effect Number: आपल्या जीवनात संख्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. काही अंक आपल्यासाठी शुभ तर काही अशुभ असतात हे तुम्ही पाहिलेच असेल. आजकाल लोक कार, बाईक आणि मोबाईल नंबर देखील खूप विचारपूर्वक आणि स्वतःच्या आवडीनुसार किंवा काही अन्य गोष्टीनुसार निवडतात.
संख्याशास्त्रात १ ते ९ पर्यंतच्या संख्येचे वर्णन उपलब्ध आहे. या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य आहे. आज आपण ५ या अंकाबद्दल बोलणार आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध ग्रह आहे, जो बुद्धिमत्ता आणि उत्तम तर्क क्षमता प्रदान करणारा मानला जातो. तसेच बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक देखील व्यापारी मनाचे असतात आणि त्यांना धनाची देवता कुबेरची कृपा असते. चला जाणून घेऊया या राशीच्या लोकांच्या खास गोष्टी.
(हे ही वाचा: स्वप्नात ‘या’ ५ गोष्टी दिसणे देतात धन प्राप्तीचे संकेत!)
असतात बिजनेस माइंडेड
मूलांक ५ असलेले लोक नेहमीच आव्हानांना आव्हाने म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. हे लोक नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात. व्यवसायात जोखीम पत्करायला ते नेहमीच तयार असतात. हे लोक मनी माइंडेड आणि बिझनेस माइंडेड असतात. भगवान बुध देखील वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे या लोकांची तर्क करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य खूप चांगले असते.
(हे ही वाचा: Budh Margi 2022: बुध ग्रह झाला मार्गस्थ; ‘या’ ५ राशींना शेअर्स आणि व्यवसायात मिळू शकते यश)
पटकन आकर्षित होतात
हे लोक पटकन मित्र बनवतात आणि त्यांना लवकर विसरतातही. त्यांना मित्रांकडूनही लाभ मिळतो. मूलांक ५ असलेल्या लोकांचे प्रेमसंबंध कायमस्वरूपी नसतात. काही लोक पैशाच्या हव्यासापोटी त्यांच्याशी प्रेमसंबंध जोडतात. हे लोक कोणाकडेही लवकर आकर्षित होतात. त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्यतः आनंदी असते.
(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशीची मुलं ठरतात परफेक्ट पार्टनर !)
मोठे व्यापारी बनतात
मूलांक ५ असलेल्या लोकांना व्यापार-उद्योगात चांगले यश मिळते. नाहीतर हे लोक बँकेत नोकरी करणारे शिक्षक किंवा प्रशिक्षक असतात. त्यांना अर्थशास्त्र आणि संगीताचेही चांगले ज्ञान असते. या मूलांक असलेल्या लोकांना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)