Numerology Mulank Six : अंकशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा विलासिता, संपत्ती, वैभव, समृद्धी, वैवाहिक आनंद व विलासी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह हा क्रमांक ६ शी संबंधित मानला जातो. महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ क्रमांक ६ असतो. या अंकानुसार जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. त्याशिवाय शुक्र ग्रह या लोकांवर छप्पर फाड धनवर्षाव करणार आहे. त्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. या क्रमांकांशी संबंधित इतर माहिती आपण जाणून घेऊ..
खूप फॅशनेबल आणि कलाप्रेमी
शुक्र ग्रहाशी संबंधित लोक खूप फॅशनेबल असतात. तसेच, हे लोक दिसायला खूप आकर्षक असतात. त्याचबरोबर या लोकांना प्रवासाची खूप आवड असते. तसेच हे लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी त्यांचा स्वभाव थोडा खेळकर असतो. त्याशिवाय ते जिथे जातात, तिथे लोकांचे लक्ष वेधून घेतात. या लोकांना लवकर वृद्धत्व येत नाही. तसेच पहिल्याच भेटीत ते कोणालाही वेड लावू शकतात. हे लोक मैत्री टिकवून ठेवण्यास सर्वोत्तम असतात; तसेच चांगले कलातज्ज्ञ व कलाप्रेमी असतात.
शुक्र ग्रहाच्या कृपेने मिळणार अफाट संपत्ती आणि पद
६ या अंकाशी संबंधित लोक आयुष्यात खूप श्रीमंत असतात. तसेच हे लोक त्यांचे जीवन थाटामाटात आणि वैभवाने जगतात. त्याच वेळी हे लोक व्यावहारिक असतात.
जर ६ मूल्यांक असलेले लोक व्यवसायात भागीदारी करू इच्छितात किंवा एखाद्याशी प्रेमसंबंधात राहू इच्छितात, तर ६ क्रमांकाच्या लोकांचे ७ मूल्यांकाच्या लोकांशी चांगल्या प्रकारे जमू शकते. त्याशिवाय ५ अंक संबंधित असलेल्या लोकांशीही त्यांचे चांगले संबंध असतात. जर ६ मूल्यांकाशी संबंधित लोकांनी फिल्म लाइन, मीडिया, मॉडेलिंग, ड्रामा व फॅशन डिझायनिंग या क्षेत्रांत करिअर केले, तर त्यांना चांगले यश मिळू शकते. तसेच या मूल्यांकाच्या लोकांनी जर कपडे, लक्झरी वस्तू, हिरे, सोने व चांदीशी संबंधित व्यवसाय करत असतील, तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो.