Numerology Valentine Day 2025: दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. विशेषतः हा दिवस प्रेमीयुगलांसाठी खूप खास असतो. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदारासमोर आपलं प्रेम व्यक्त करतात, मनातील भावना व्यक्त करतात. जोडीदाराला सुंदर भेटवस्तू, चॉकलेट, पुष्पगुच्छ, ग्रीटिंग कार्ड भेट देतात. काही जण या दिवशी त्यांच्या जोडीदाराबरोबर डेटवर जातात. अंकशास्त्रानुसार, यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आधी काही जोडप्यांचं प्रेमाचं नातं अधिक फुलू शकतं. व्हॅलेंटाईन डेच्या आधी त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. तसंच काही लोकांना खरं प्रेम मिळू शकतं, काही जोडप्यांमधील सुरू असलेले मतभेद, रागरुसवे, वाद आता संपू शकतात. अंकशास्त्रात नेमकं काय सांगितलं जाणून घेऊ… .

या’ जन्मतारखेच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये होईल प्रेमाचा वर्षाव

जन्मतारीख, मूल्यांक आणि भाग्यांक हे अंकशास्त्रात म्हणजेच न्यूरोलॉजीमध्ये मोठी भूमिका बजावतात. त्यांच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची लव्ह लाइफ कशी असेल हे जाणून घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूल्यांक निश्चित केला जातो. अंकशास्त्रानुसार, जर तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची २, ५, ६, ९, १२, १५, १८, २१, २५, २८ किंवा २७ असेल, तर या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या आधी तुमच्या लव्ह लाइफमध्ये काहीतरी चांगलं घडू शकतं.

जर तुम्ही आधीच कोणाबरोबर प्रेमसंबंधात असाल, तर यावेळी तुमचं नातं अधिक बहरू शकतं. कितीही वाद, रुसवे, फुगवे असले तरी ते सर्व विसरून आता तुम्ही पुन्हा एकत्र येऊ शकता. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होऊ शकतं. जर तुम्ही अविवाहित असाल तर या वर्षी तुम्हाला कोणीतरी खास व्यक्ती भेटू शकते, जी तुमचे हृदय जिंकू शकेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अधिक वेळ घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना चांगले समजून घेण्यास मदत होईल.

Story img Loader