Lakshmi Narayan Yog After Makar Sankranti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वर्ष २०२४ हे काही अत्यंत महत्त्वाच्या ग्रह गोचारांचे वर्ष ठरणार आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये सूर्य, बुध, शुक्र हे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ७ जानेवारी २०२४ रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे तर १८ जानेवारी २०२४ ला शुक्र ग्रह धनु राशीत जाणार आहे. धनु राशीत एकत्र आलेल्या शुक्र व बुधाची युती ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ साकारणार आहेत. मकरसंक्रांतीच्या लगेचच नंतर हा शुभ योग सक्रिय होणार असल्याने जानेवारीच्या पहिल्या महिन्यापासूनच काही राशींचे भाग्य उजळणार आहे. तिळगुळाचा गोडवा नात्यात सुद्धा येऊन धनलाभ होण्यासाठी कुंडलीत महत्त्वपूर्ण योग जुळून येणार आहेत. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या भाग्यात करोडपती होण्याची संधी कोणत्या स्वरूपात येऊ शकते याविषयी जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशीचे लोक होतील करोडपती?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

लक्ष्मी नारायण राजयोग आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग आपल्या कुंडलीत आर्थिक स्थानी तयार होत असल्याने येत्या काळात तुमची मिळकत वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला १८ जानेवारीपासून पुढे केलेली प्रत्येक गुंतवणूक लाभ मिळवून देऊ शकते. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आर्थिक मिळकतीच्या कक्षा रुंदावण्याची शक्यता आहे. तुम्हाला संततीप्राप्तीचे योग आहेत आणि घरी येणाऱ्या याच नव्या पाऊलांच्या रूपात धनलक्ष्मीची कृपा सुद्धा लाभू शकते.

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने मीन राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या राजयोगाची निर्मिती तुमच्या कुंडलीत कर्म भावी होत आहे. नोकरदार मंडळींना या कालावधीत पद व पगार दोन्हीमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थितीनुसार तुमचे समाजातील स्थान सुद्धा अधिक दृढ होऊ शकते. बेरोजगार लोकांना या कालावधीत पद व पगारवाढ सुद्धा होऊ शकते. नव्या नोकरीची संधी तुमच्या हाती येऊ शकते. व्यापारी वर्गाला सुद्धा याकाळात प्रचंड मोठी डील पूर्ण करून प्रचंड पैसे कमावता येऊ शकतात. तुम्हाला या कालावधीत जोडीदाराच्या रूपात लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळू शकतो.

हे ही वाचा<< ३ जानेवारी पंचांग: उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात शोभन योग बनल्याने आज १२ राशींना दिवस कसा जाणार? ‘या’ गोष्टी टाळा

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

लक्ष्मी नारायण राजयोग हा वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा राजयोग आपल्या राशीच्या धन व वाणीच्या प्रभावित स्थानी तयार होत आहे. या कालावधीत तुम्हाला अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. व्यायवसायिकांना या कालावधीत अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. भौतिक सुख-सुविधेत वृद्धी होईल. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत यश मिळेल. व्यावसायिक जीवनात महत्वकांक्षा वाढू शकते आणि त्यातूनच एक नवी उमेद मिळू शकते. तुम्हाला वाणीच्या माध्यमातून यश, प्रगती व धनलाभाची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On 18th january lakshmi narayan yog after makar sankranti these rashi to get more money extreme benefits will spread happiness svs