Akshaya Tritiya 2025 Marriage: अक्षय्य तृतीयेचा दिवस हा सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला आहे. अक्षय्य तृतीयेला साखरपुडा, लग्न, मुंडन, जानवे, गृहप्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच अक्षय्य तृतीयेचा दिवस सोने-चांदी खरेदी करण्यासाठी, घरे आणि कार खरेदी करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी देखील शुभ आहे. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात आनंद आणि समृद्धी आणतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणजे या दिवशी केलेले पुण्य कर्म कधीही संपत नाही, खरेदी केलेल्या गोष्टींची कमतरता कधीही भासत नाही, जुळलेली नाते कधीही तुटत नाही असे मानले जाते. याच कारणामुळे भारतात अक्षय्य तृतीयेला लग्न करणे शुभ मानले जाते.

अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही, संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक विवाह होतात. या वर्षी अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५ रोजी आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणी विवाह करणे सर्वात योग्य मानले जाते ते जाणून घेऊया. या दिवशी लग्न करणार्‍यांचे आयुष्य खूप आनंदी असते. अशा पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते. कारण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र त्यांच्या सर्वात तेजस्वी अवस्थेत असतात.

कुंडली

कोणताही मुहूर्त न पाहाताच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असे जोडपे लग्न करू शकते ज्यांना विवाह करायचा आहे पण त्यांची जन्मकुंडली नाही.

विवाह मुहूर्त

ज्यांच्या लग्नासाठी वर्षभरामध्ये कोणताही शुभ मुहूर्त नसतो किंवा जे लग्नकरण्यासाठी फार वाट पाहू इच्छित नाही आणि त्यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे ते जोडपे कोणताही मुहूर्त न काढता किंवा पंचाग न पाहाताच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असे जोडपे लग्न करू शकते.

कुंडली जुळत नाही

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असे जोडपे लग्न करू शकते ज्यांची जन्मकुंडली जुळत नाही पण त्यांना एकमेकांशीच लग्न करायचे आहे.

मंगळ दोष

ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे आणि लग्नात अडचणी आहेत त्यांचे लग्न देखील अक्षय्य तृतीयेला केला जाऊ शकतो. अक्षय्य तृतीयेला लग्न करण्यासाठी कुंडलीतील सर्व नकारात्मक परिणामांपासून सुटका मिळवू शकता.