Aries To Pisces Horoscope Today : १ एप्रिलला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी रात्री २ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपासून प्रीति योग सुरू होईल. आज भरणी नक्षत्र दुपारी ११ वाजून ०७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे.तसेच आज राहू काळ दुपारी ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज अंगारकी विनायक चतुर्थी असणार आहे. ही मराठी नववर्षातील पहिली विनायकी चतुर्थी असणार आहे. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे. तर हिंदू नववर्षाचा दुसरा दिवस आणि नवीन एप्रिल महिन्याचा पहिला दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

भाऊबंदकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On angaraki vinayak chaturthi which zodiac signs will get sudden financial gains read the horoscope of 12 zodiac signs in marathi asp