Palmistry: हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार लोकांच्या हस्तरेषा पाहून त्यांचे भविष्य, स्वभाव, व्यक्तिमत्वाबाबत माहिती मिळते. तळहातावरील रेषा पाहून व्यक्तीच्या करिअरमध्ये यश मिळेल की नाही, त्याची आर्थिक स्थिती कशी राहील, वैवाहित जीवन सुखी राहेल की नाही हे जाणून घेता येते असे मानतात. हस्तरेखांमध्ये काही चिन्ह देखील आहेत जे काही व्यक्तींसाठी अत्यंत शुभ असतात तर काहींसाठी अशुभ असतात असे मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार तळहातावर काही विशेष चिन्ह असतात जी काहींसाठी अशुभ ठरतात तर काहींसाठी शुभ ठरतात. या चिन्हामुळे काही लोकांना आयुष्यभर चिंता- समस्येचा सामना करावा लागू शकतो तर काही लोकांसाठी हे चिन्ह भाग्यशाली ठरू शकते आणि व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक सुख- सुविधा मिळते असे मानले जाते. आज आम्ही तळहातावर असलेल्या X चिन्हाबाबत सांगणार आहोत.

तळहातावरील हे चिन्ह असणे ठरते भाग्याचे?
ज्या व्यक्तीच्या तळहातावर ‘X’ हे चिन्ह असते तो खूप भाग्यवान असतो असे मानतात. हस्तरेषाशास्त्रात हे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या तळहातावर हे चिन्ह असते त्याला सर्व सुख प्राप्त होते आणि त्याचे आयुष्य आनंदाने व्यतीत होते.

गुरु पर्वत स्थानी असावे ‘X’ चिन्ह
हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहातावरील गुरूच्या पर्वत स्थानी ‘X’ चिन्ह असते त्याला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. असे म्हणतात, अशा व्यक्तीचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो. हे चिन्ह असलेल्या व्यक्तीला आयुष्यात मान-सन्मान मिळतो आणि ते उच्च पदावर पोहोचतो असे मानले जाते.

हेही वाचा – सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ?

शनी पर्वत स्थानी असावे X’ चिन्ह
हस्तरेषा शास्त्रानुसार व्यक्तीच्या तळहातावरील शनी पर्वत स्थानी X’ चिन्ह असणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, शनी पर्वतावर X’ चिन्ह असलेल्यां लोकांबरोबर काही अप्रिय घटना घडण्याची, भांडणात दुखापत होण्याची शक्यता दर्शवते.

सूर्य पर्वत स्थानी असावे ‘X’ चिन्ह
हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या तळहातावर सूर्य पर्वत स्थानी ‘X’ चिन्ह असते, अशा व्यक्ती प्रशासकीय क्षेत्रात चांगले करिअर करू शकतात आणि यशाच्या दिशेने जातात असे मानले जाते. असे म्हणतात, या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो. त्यांना कधीकधी जीवनात सन्मान गमावावा लागू शकतो असे मानले जाते.

हेही वाचा – पुढील महिन्यात शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश! ‘या’ राशींवर होऊ शकतो धनवर्षाव?

दोन्ही हातांवर असणे ‘X’ चिन्ह
हस्तरेखाशास्त्रानुसार, दोन्ही हातांवर X’ चिन्ह असणे खूप शुभ असते. असे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते असे मानले जाते. असे म्हणतात की, ‘त्यांना आयुष्यात खूप मान मिळतो आणि ते आपल्या मुलांसाठी कोटींमध्ये पैसा मागे सोडतात.’

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palm astrology know meaning of x letter on plam considered as lucky they earn lot of money snk