हस्तरेखाशास्त्रज्ञ सांगतात की, हाताच्या प्रत्येक बोटाचे स्वतःचे महत्त्व असते. तुमच्या हातातील प्रत्येक बोट तुमच्याबद्दल सांगत असतात. बोटाव्यतिरिक्त तुमच्या हाताचा अंगठा देखील तुमच्याबद्दल अनेक रहस्ये उघड करतो. हस्तरेखाशास्त्रज्ञांच्या मते, अंगठ्याचे अनेक प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रत्येकाच्या हाताचा अंगठा हा दुसऱ्याच्या हातापेक्षा वेगळा असतो. अंगठ्याचा आकार तुमच्याबद्दल बरेच काही सांगू शकतो. अनेकांचा अंगठा लांब असतो, तर अनेकांचा अंगठा लहान असतो.
प्रत्येकाच्या अंगठ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जर अंगठा काटकोन बनवण्यासाठी सरळ केला तर तो काटकोनाचा अंगठा असतो. अशा प्रकारचा अंगठा असलेल्या लोकांची ओळख त्यांच्या कणखर विचारांनी केली जाते. अशी लोकं मजबूत मनाचे असतात. तसेच त्यांना पराभूत करणे सोपे नसते. अशा व्यक्तीचा पराभव झाला तरी ते पुन्हा लढायला तयार असतात. आयुष्यात सहज पराभूत होऊ शकत नाही. तसेच ते कधीही हरले तर ते पुन्हा लढायला तयार असतात.
ज्या लोकांचा अंगठा तर्जनीच्या मध्यभागी जातो, अशा लोकांचा अंगठा सामान्य आकारापेक्षा लांब असतो. या लोकांमध्ये विशेष गुण असतात. या लोकांचे विचार मुक्त आहेत, तसेच विचारसरणी देखील इतरांपेक्षा वेगळी असते. ही लोकं प्रत्येक मुद्द्यावर आपले सकारात्मक मत द्यायला तयार असतात. असे म्हणतात की या लोकांचे गणित चांगले असते आणि या लोकांमध्ये यशस्वी अभियंता बनण्याचे गुण असतात.
अनेक लोकांचा अंगठा शरीराच्या इतर भागाच्या त्वचेपेक्षा कडक असतो. अशा लोकांना हट्टी म्हणतात पण असे लोकं मानसिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात. ही लोकं स्वतःचे काम करतात आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही केले जाऊ शकत नाही. तर काही लोकांचा अंगठा लहान असतो. जर तुमचा अंगठा तर्जनीपर्यंत पोहोचू शकत नसेल, तर अशा अंगठ्याला छोटा अंगठा मानला जातो. अशी लोकं खूप मेहनती असतात, तर हे लोकं दुसऱ्याच्या विचारांचे पालन करतात.