Hand Line Prediction : ज्योतिष शास्त्रात मनुष्याच्या कुंडलीचे विश्लेषण करून त्याच्या भविष्य आणि व्यक्तित्वाबद्दल अंदाज लावले जातात. त्याचप्रकारे हस्तरेषा शास्त्रात माणसाच्या हातावर असणाऱ्या रेषा आणि चिन्हांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल माहिती मिळवता येते. आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, त्यांच्यापैकी एक असते ती म्हणजे सूर्य रेषा. सूर्य रेषा अनामिका खाली असते जिथे सूर्य पर्वत असतो. या पर्वतावर जर उभी रेषा असेल तर तिला सूर्य रेषा म्हणतात. जाणून घेऊया सूर्य रेषेशी संबंधित काही खास गोष्टी…

आयुष्य मोठे असते

हस्तरेषा शास्त्रात सूर्यरेषेला अत्यंत शुभ मानले जाते. ज्यांच्या हातावर ही रेषा असते त्यांच्या आयुष्यात सुखाची कमी नसते. ही रेषा जर भाग्य रेषेला जाऊन मिळाली तर अशा लोकांचे आयुष्य मोठे असते. सोबतच हे लोक निरोगी असतात आणि त्यांना सहसा आजार होत नाहीत.

धार्मिक शास्त्रानुसार ‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं पडतं महागात, जाणून घ्या

मोठे उद्योजक बनतात

जर हातावर सूर्य आणि बुद्ध पर्वत एकत्र आले आणि मस्तिष्क रेषेवर बुध आणि सूर्य रेषा एकत्र आली तर अशी व्यक्ती व्यापारी बनू शकते. हे लोक देश-विदेशात व्यापार करतात. पैशांसोबतच या व्यक्ती खूप नाव कमावतात. हे लोक तरुण वयात व्यवसायातील बारकावे शिकतात आणि चांगले पैसे कमावतात.

अभिनेते किंवा राजकीय व्यक्ती होतात

ज्या व्यक्तीची सूर्य रेषा जीवन रेषेवर येऊन समाप्त होते त्या व्यक्ती आपल्या क्षेत्रात खूप नाव कमावतात. तसेच सूर्य रेषा जर चंद्र पर्वताला जाऊन मिळाली तर अशा व्यक्ती प्रसिद्ध अभिनेता किंवा राजकीय नेता बनतात. या लोकांना समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभते. तसेच यांना फिरण्याची हौस असते.

‘या’ व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही; मार्गात येतात अनेक अडथळे

जर एखाद्याच्या हातावर सूर्य रेषेसोबतच भाग्य रेषा आणि बुद्ध रेषा मणीबंधातून निघत असेल आणि तिन्ही रेषा सरळ आणि स्पष्ट दिसत असतील तर या व्यक्तींकडे धनाची कमी नसते. या लोकांचा सुरुवातीचा काळ मेहनतीचा असतो परंतु नंतर या व्यक्ती सुख आणि ऐश्वर्याचा आनंद घेतात. या लोकांना महागड्या वस्तू घेण्याची हौस असते. या व्यक्ती आपली हौस पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader