Panchgrahi Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा त्रिग्रही आणि पंचग्रही योग तयार करतात. अशा योगांचा मानवी जीवनावर अधिक परिणाम होताना दिसतो. सध्या राहू, शनि, शुक्र आणि बुध मीन राशीत आहेत. आता २५ एप्रिल रोजी पहाटे ०३:२५ वाजता, चंद्र कुंभ राशीतून निघून त्याच्या गतीनुसार मीन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे पाच ग्रहांची युती होईल आणि पंचग्रही योग तयार होईल. हा योग अत्यंत प्रभावशाली मानला जातो. तब्बल १०० वर्षांनी हा राजयोग तयार होणार असून ५४ तासांसाठी हा राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.

‘या’ राशींना धनलाभ होण्याची शक्यता

वृषभ

वृषभ राशींच्या लोकांसाठी पंचग्रही योग अत्यंत लाभदायी ठरु शकतो. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा दुप्पट मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकतात.

कर्क

कर्क या राशीला देखील पाच ग्रहांचा आशीर्वाद मिळू शकतो. व्यवसायात तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन देखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. तुमच्या घरात किंवा कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

मीन

पंचग्रही योगामुळे मीन राशीच्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. यावेळी तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. तुमच्उयासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. आयात-निर्यातीत गुंतलेले व्यापारी चांगला नफा कमवू शकतात. नोकरदार लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुमच्या समृद्धी सोबत लक्झरी सुखात वाढ होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)