हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. यंदाची अक्षय्य तृतीया २२ एप्रिल २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ कार्यासाठी आणि सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी खरेदीसोबतच दान करणेही खूप महत्त्वाचे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे, कारण, यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य, गुरू, बुध, राहू आणि युरेनस या ५ ग्रहांची युती होणार आहे. या दिवशी चंद्र आणि शुक्र दोघेही वृषभ राशीमध्ये अतिशय शुभ आणि फलदायी स्थितीत असणार आहेत. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया ४ राशींसाठी लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरु शकते. तर त्या चार राशी कोणत्या आहेत ते ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया.
हेही वाचा- Akshay Tritiya 2023 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या मुहूर्त आणि पौराणिक महत्त्व
मेष –
मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया लाभदायक ठरु शकते. कारण मेष राशीत पंचग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच त्यांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. ग्रहांच्या शुभ योगामुळे तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तर नोकरदारांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
वृषभ –
अक्षय्य तृतीयेचा पंचग्रही योग वृषभ राशीतील जे लोक कलेशी निगडित आहेत त्यांच्यासाठी खुप फायदेशीर ठरु शकतो. तसेच तुमच्या दिर्घकाळापासून ज्या आर्थिक आणि मानसिक समस्या होत्या त्या दूर होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयी प्राप्त होऊ शकतात. कुंडलीत राजयोग तयार होतोय, ज्यामुळे या लोकांना धनलाभासह प्रतिष्ठाही मिळू शकते. शिवाय वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची राहू शकते.
कर्क –
अक्षय्य तृतीयेला कर्क राशीच्या लोकांना धनलाभ आणि समृद्धी मिळू शकते. या राशीच्या लोकांना पंचग्रही योग खूप लाभ ठरु शकतो. या काळात तुम्हाला कोणतीही मोठी संधी मिळू शकते. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
सिंह –
या राशीच्या लोकांसाठी हा पंचग्रही योग खूप लाभदायक ठरु शकतो. या राशीत सूर्य पाचव्या स्थानी गोचर करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप खास ठरु शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक लाभासह प्रगतीही होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)