Panchgrahi Yog in Meen Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो. २०२५ हे वर्ष ग्रहांच्या स्थितीच्या दृष्टीने खूप खास आहे, कारण या वर्षी मीन राशीत ग्रहांचा अनोखा संयोग दिसून येणार आहे. चंद्र ग्रह २२ एप्रिल रोजी मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत शनी, चंद्र, बुध, शुक्र आणि राहूचा अनोखा संयोग जुळून येणार आहे. २५ एप्रिल रोजी पहाटे ३:२५ वाजता हा संयोग जुळून येईल. यामध्ये पाच ग्रहांचे एकत्र येणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पंचग्रही योग निर्माण होणार आहे. काही राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग फार सकारात्मक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी सुखाचे दिवस येणार…

‘या’ राशींच्या नशिबाला मिळू शकते कलाटणी

मीन

पंचग्रही योग मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. करिअरच्या दृष्टीने हा काळ फलदायी ठरु शकतो. करिअरमध्ये प्रगती दिसून येऊ शकते. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यात प्रगती होऊ शकेल. काम पुढे नेण्यासाठी गुंतवणूक वाढविण्याचा विचार करू शकता. उत्पन्नाचे नवीन साधन मिळून व्यवसायात लाभ होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होऊ शकते. नशीब तुमच्या बाजूने असू शकते. नोकरदारांना वेतनवाढ आणि बढतीचा लाभ मिळू शकतो. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते.

कुंभ

कुंभ राशीला पाच ग्रहांचा आशीर्वाद मिळेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत गवसणार आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी यशदायी ठरु शकते. तुम्ही या काळात धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. भौतिक सुखामध्ये वाढ होऊ शकते.

मिथुन

पंचग्रही योग मीन या राशीच्या मंडळींसाठी शुभ परिणाम घेऊन येणारा ठरु शकतो. या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. या दरम्यान बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. या व्यतिरिक्त, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा वेळ अनुकूल ठरु शकते. तुमचे प्रेम जीवन आनंददायी असेल. हा महिना तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात. संततीकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)