Aries To Pisces Horoscope Today : आज २५ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी आज रात्री ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असणार आहे. शिवयोग २ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच श्रवण नक्षत्र रात्री ३ वाजून ५० मिनिटांपर्यत जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज पापमोचनी एकादशी असणार आहे. पापमोचिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी विष्णू भगवानची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते आणि धार्मिक मान्यता आहे. तर आज भगवान विष्णू तुम्हाला कोणत्या रुपात आशीर्वाद देणार हे आपण जाणून घेऊया…

२२ मार्च पंचांग व राशिभविष्य:

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)

कौटुंबिक प्रगतीचा विचार कराल. हातातील कामात यश येईल. एखादी नवीन संधी चालून येईल. नवीन मित्र जोडाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. दिवस चैनीत घालवाल. निसर्ग सान्निध्यात रमून जाल. घरात कर्तेपणाचा मान मिळेल. तिजोरीत भर पडेल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)

सर्वांना गोड बोलून आपलेसे करावे. घरातील लोकांच्यात वेळ घालवाल. आवडी-निवडीबद्दल दक्ष राहाल. घरातील कामात हातभार लावाल. पत्नीची प्रेमळ साथ मिळेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)

आपल्याच मर्जीने वागणे ठेवाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. तुमच्यातील अरसिकता वाढेल. वादाचा मुद्दा उकरून काढू नका. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)

वैचारिक स्थैर्य जपावे. अडचणीवर मात करता येईल. मानसिक उभारी ठेवावी लागेल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. फार विचार करत बसू नका

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)

जोडीदाराचे वर्चस्व राहील. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. तुमची सामुदायिक प्रतिष्ठा वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)

घरगुती कलह वाढू देऊ नका. सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ साधावा. स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. अती अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)

भावंडांना मदत करावी लागेल. मित्रांचे सहकार्य घ्यावे लागेल. नातेवाईक नाराज होऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)

हातातील कामे खोळंबू शकतात. कौटुंबिक अडचण सोडवता येईल. जुगारातून लाभ संभवतो. फसवणुकीपासून सावध राहा. आर्थिक उलाढाली सजगतेने कराव्यात.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)

कामाचा उत्साह कायम ठेवावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पीत्त विकार बळावू शकतात. कामातील प्रतिकूलता प्रयत्नाने दूर करावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)

अघळ-पघळ गप्पा माराल. वादाचे मुद्दे दूर ठेवावेत. कामाचा फार ताण घेऊ नये. जबाबदारी उत्तम रित्या पेलाल. घराची स्वच्छता काढाल.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)

इतरांशी वाद वाढू शकतो. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठांना नाराज करू नका. मनाजोगी खरेदी करता येईल. घराबाहेर वावरतांना सावध राहावे लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर