Parakram Yog : ज्योतिषशास्त्रानुसार ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी सूर्य ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर मंगळ ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा युती होणार आहे. ज्यामुळे पराक्रम योग तयार होणार आहे. तर सूर्य आणि मंगळाचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव दिसून येऊ शकतो. तसेच हे दोन्ही ग्रह वृश्चिक राशीत विराजमान असणार आहेत. ज्योतिषांच्या मते, हा योग लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणणारा ठरु शकतो. या योगाच्या निर्मितीमुळे धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासात वाढ होते तसेच लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. तर पराक्रम योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना विशेष फायदे होऊ शकतो ते जाणून घेऊया.

मेष रास – (Mesh Zodiac)

Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मेष राशीच्या लोकांसाठी पराक्रम राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्हाला तुमचे करिअर उजळण्याची संधी मिळू शकते. व्यवसायातही भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. फ्रेशर्सना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील ज्यामुळे तुम्हाला कर्जातूनही दिलासा मिळू शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी पराक्रम योग शुभ सिद्ध होऊ शकतो. ज्येष्ठ नक्षत्रात हा योग तयार होत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक कलहातून तुम्हाला आराम मिळू शकतो. भौतिक सुखसोयी मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. तसेच या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा- डिसेंबर महिन्यात ‘या’ राशींचे नशीब पालटणार? ५ मोठे ग्रह राशी परिवर्तन करताच ‘अच्छे दिन’ सुरु होण्याची शक्यता

तूळ रास (Tula Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी पराक्रम योग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला इच्छित यश मिळू शकते. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना थोडी मेहनत करावी लागेल, पण यश नक्कीच मिळू शकते. तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभ आहे. कठीण कामातही यश मिळू शकते. यासोबतच कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या महिन्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader