सोमवारपासून (ता, ५ ऑगस्ट)पासून श्रावण महिना सुरु होत आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. श्रावण महिना केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच नव्हे, तर भक्ती, अध्यात्म व सण यांचा मेळ घालणाराही महिना आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात. त्याबरोबरच त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
अंक ज्योतिषशास्त्रानुसार काही असे मुलांक आहेत जे भगवान शंकराला खूप प्रिय आहे. चला तर मग जाणून घेऊ या
मूलांक संख्या
अंकशास्त्रात मूलांक १ ला विशेष महत्व आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक १ आहे.
प्रतिक
मुलांक एक असलेल्या लोकांचा शासक ग्रह सूर्य आहे आणि तो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो. तसेच हा अंक भगवान शिवाला खूप प्रिय आहे.
प्रामाणिक
या मुलांकाचे लोक खूप प्रामाणिक आणि प्रभावशाली असतात.
क्षमता
तसेच, या मुलांकाचे जन लोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते.
यश
अंकशास्त्रानुसार, मुलांक १ असलेल्या लोकांचे करिअरही चांगले असते. त्यांना उच्च शिक्षणात यश मिळते.
आर्थिक स्थिती
या मूलांकाचे लोक संशोधन क्षेत्रात जाऊ शकतात आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते.
व्यवसाय
या मूलांकाच्या लोकांना व्यवसायातही भरपूर यश मिळते. त्यांच्याकडे आयुष्यभर पैशाची कमतरता नसते.
शुभ दिवस
त्यांच्यासाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस आणि शुभ तारखा १, ४ १०, १३, १९, २२, २८ आहेत. त्याचबरोबर शुभ रंग पिवळा आणि शुभ रत्न माणिक आहे.
हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.