Personality Traits : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशेष गुण असतात तर काही कमतरता सुद्धा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या सर्वांचा संबंध व्यक्तीच्या जन्माची वेळ आणि तारखेशी असतो. अंक शास्त्रानुसार, जन्म तिथि ही एक पासून नऊ पर्यंत अंक असते, यालाच मूलांक म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माचा मूलांक त्याच्या जन्मतिथिनुसार वेगवेगळा असतो. या मूलांकनुसार तुम्ही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेऊ शकता.
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक ९ असतो. या मूलांकचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. या लोकांचा कारक मंगळ ग्रह असतो त्यामुळे या मूलांकचे लोक मंगळ ग्रहापासून प्रभावित असतात. आज आपण या लोकांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : गुरु झाले स्वामी, धनलाभाची संधी नामी! शनी जयंतीनंतर ५८ दिवस प्रचंड श्रीमंती व आनंद मिळवतील ‘या’ ३ राशी, वाटा लाडू पेढे

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
Rahu Gochar 2025
१८ वर्षानंतर राहु करणार कुंभ राशीमध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशी होतील मालामाल, मिळणार पैसाच पैसा
Numerology: Introverts Born on These Dates
‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात इंट्रोवर्ट; शनिच्या कृपेने मिळते यांना पैसा, धनसंपत्ती अन् यश
Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
timothy hyman ra biography artist timothy hyman career journey
व्यक्तिवेध : टिमथी हायमन

धनसंपत्ती

कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहते. या मूलांकच्या जास्तीत जास्त लोकांना वडिलोपार्जित धन संपत्ती प्राप्त होते. अनेकदा या कारणांमुळे या लोकांना वादविवादाचा सामना करावा लागतो. या लोकांची सतत धनसंपत्ती वाढत असते पण त्याच बरोबर या लोकांना भरपूर पैसा खर्च करायला आवडतो.

स्वभाव

मंगळ ग्रहाचा प्रभाव मूलांक ९ असलेल्या लोकांवर दिसून येतो. हे लोक धाडसी, पराक्रमी, मेहनती आणि उत्साही असतात. या लोकांना हसून खेळून जगायला आवडते यामुळे त्यांच्या मित्रांमध्ये सुद्धा हे खूप लोकप्रिय असतात पण त्यांना राग सुद्धा खूप लवकर येतो. हे लोक शिस्त प्रिय असतात. या लोकांना कोणतीही समस्या आल्यानंतर मागे वळत नाही. ते समस्यांचा खंबीरपणे सामना करतात.

हेही वाचा : जून महिना भरभराटीचा; वृषभ राशीत पाच ग्रहांचा संयोग, ‘या’ पाच राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा

प्रेमसंबंध

या तारखेला जन्मलेल्या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये अडी-अडचणी येतात. या लोकांचे प्रेम संबंध स्थिर नसतात. अहंकारामुळे या लोकांच्या नात्यात दुरावा येतो. या लोकांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो.

करिअर

मूलांक ९ असलेल्या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. या लोकांना लोक खेळ, पोलीस सेवा, इत्यादी क्षेत्रात आवड असते. यांना सुरूवातीपासून संघर्ष करावा लागतो पण दृढनिश्चय आणि इच्छा शक्तीच्या जोरावर ते आयुष्यात संधीचे सोने करू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)