काही प्राणी आपल्याला फार आवडतात, परंतु काही प्राणी बघून आपल्यालाच भीती किंवा किळस वाटतो. असे प्राणी म्हणजे साप, उंदीर, झुरळ, पाल इत्यादी. मात्र, निसर्गात प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. तसेच धर्म शास्त्र, ज्योतिष इत्यादींमध्ये कित्येक जीवांना शुभ म्हटले गेले आहे. यापैकी काहींची तर पूजा देखील केली जाते. सनातन धर्मात गाईला मातेचा दर्जा पवित्र मानला जातो. या प्राण्यांची पूजा करणे, त्यांची काळजी घेणे, अन्नदान करणे याने पुष्कळ पुण्य प्राप्त होते. ते जीवनात आनंद आणि समृद्धी देखील देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच शुभ मानले जाणाऱ्या जीवांमध्ये पालीचा देखील समावेश आहे. असे तर बहुतांश लोकांना पालीचा किळस वाटतो किंवा त्यांना तिची भीती वाटते. परंतु धन संपत्तीच्या दृष्टीने पालीला शुभ मानले जाते. नवीन घराच्या वास्तुपूजेतही चांदीचा सरडा ठेवून त्याची पूजा केली जाते. घरामध्ये पाल असल्यास त्याचे अनेक फायदे असतात. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती नेहमीच चांगली असते. घरातील लोकांमध्येही प्रेम कायम राहते.

तुमची पैशांची तिजोरी घराच्या ‘या’ दिशेला तर नाही ना? वायफळ खर्चात होऊ शकते वाढ

पालीशी संबंधित काही शुभ संकेत

  • देवघराच्या आसपास पाल दिसणे शुभ असते.
  • दिवाळीच्या रात्री घरामध्ये पाल दिसली तर समजावे की देवी लक्ष्मी वर्षभर तुमच्यावर अपार कृपेचा वर्षाव करणार आहे.
  • नवीन घरात प्रवेश करताना पाल किंवा सरडा दिसला तर ते खूप शुभ असते. तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद असण्याचे हे लक्षण आहे.
  • घरात एकाच ठिकाणी ३ पाली दिसणे देखील शुभ असते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People get scared seeing the lizard in the house but it is very auspicious pvp