Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला वडिलांचा आणि चंद्राला आईचा कारक मानले जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका असते. विशेष म्हणजे वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अधिक आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे लोक उत्तम वडील असतात. ते मुलांसाठी एक आदर्श असतात. आज आपण या राशींविषयी जाणून घेऊ या.

वृषभ राशी –

वृषभ राशीच्या लोकांना चांगले वडील समजले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या लोकांना आपल्या मुलांविषयी खूप जिव्हाळा असतो. असे म्हणतात की या राशीचे लोक नेहमी आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आयुष्याची नीतिमूल्ये शिकवतात.

Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?

हेही वाचा : Chanakya Niti : ‘या’ चार गोष्टींमुळे तुमचे वैवाहिक आयुष्य येऊ शकते संकटात? वाचा, चाणक्य नीती काय सांगते?

मिथुन राशी –

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक नेहमी आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे हे लोक चांगले वडील बनतात. मिथुन राशींच्या लोकांना त्यांच्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात नाव कमवावे, असे वाटते. असे मानले जाते की त्यांचा स्वभाव हा त्यांच्या मुलांना खूप आकर्षित करतो, त्यामुळे या राशीचे लोक आपल्या मुलांसाठी आदर्श असतात.

कर्क राशी –

कर्क राशीचे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मुलांप्रति या राशीचे लोक खूप संवेदनशील असतात, त्यामुळे या राशींचे लोक त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडतात.

हेही वाचा : Chandra Grahan 2023 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ; भारतावर दिसणार थेट परिणाम?

मकर राशी –

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीचे लोक चांगले वडील असतात. ते नेहमी आपल्या मुलांना समोर जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. असं म्हणतात की या राशीचे वडील आपल्या मुलींना राजकुमारीसारखे वाढवतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader