Foodie Zodiac Signs : प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, सवयी किंवा छंद वेगवेगळे असतात. काही लोकांना खाण्याचा छंद असतो. अशा लोकांना नेहमी नवनवीन पदार्थ खायला आवडतात.
खरं तर माणूस पोटापाण्यासाठी कष्ट करतो. अन्न ही माणसाची प्राथमिक गरज असते, पण सतत फक्त खाण्याचा विचार करणे हे खादाड असण्याचे लक्षण असते. आज आपण अशाच चार खादाड राशींविषयी जाणून घेऊ या.

मेष

मेष राशीच्या लोकांना खायला प्रचंड आवडते. यांना तळलेले किंवा बटाट्याचे पदार्थ सर्वात जास्त आवडतात. यांना वेगवेगळ्या नवीन नवीन पदार्थांचा स्वाद घ्यायला आवडतो. या राशीच्या व्यक्तींना घरीसुद्धा नवनवीन पदार्थ बनवायला आवडते.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असतो.
शुक्र ग्रह हा धन वैभवाचा कारक मानला जातो. वृषभ राशीच्या लोकांना फिरायला किंवा पार्टी करायला खूप आवडते. या राशीची व्यक्ती इतरांनासुद्धा जेवायला आवडीने आमंत्रित करतात. यांना खाण्याची इतकी आवड असते, की ते अनेकदा प्रमाणाबाहेर खातात; त्यामुळे यांना शारीरिक समस्यांचासुद्धा अनेकदा सामना करावा लागतो.

हेही वाचा : Chanakya Niti : ‘या’ चुकांमुळे व्यक्तीच्या जीवाला कधीच शांतता मिळत नाही; चाणक्य सांगतात, “मृत्यूनंतरही…”

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना गोड पदार्थ खाण्याचा खूप छंद असतो. ते कधीही गोड पदार्थाला नकार देत नाही. नवनवीन गोड पदार्थ आवडीने खातात. यांना नेहमी जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ खायची सवय असते.

मकर

मकर राशीचे लोक हेल्दी आहार घेतात. त्यांना हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळींचा समावेश असलेला आहार आवडतो. हे लोक खूप खादाड असतात, पण नेहमी आरोग्यदायी आहार घेणे यांना आवडते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)