प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक आपल्या मर्जीप्रमाणे जगतात तर काहींना इतरांना स्वतःच्या तालावर नाचवणे आवडते. तसेच, काही लोकांना फक्त आपला स्वार्थ साध्य करण्यात रस असतो. अशा व्यक्ती आपल्या चातुर्याने कोणालाही मात देऊ शकतात. आज आपण अशा राशीच्या लोकांबाबत जाणून घेणार आहोत ज्या खोटं बोलण्यात हुशार असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन : या राशीचे लोक त्यांच्या दुहेरी व्यक्तिमत्त्वाची ओळखले जातात. या व्यक्ती अतिशय मूडी असतात. तसेच या स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारतात. या व्यक्ती समोरच्या व्यक्तींना आपल्या बोलण्यात अशाप्रकारे गुंडाळून ठेवतात की यांचं खोटं बोलणं देखील खरं वाटतं. या राशीच्या व्यक्ती बोलण्यात अतिशय पटाईत असतात.

रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य

कर्क : या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात. सोबतच या व्यक्ती खोटं बोलण्यात पटाईत असतात. याव्यतिरिक्त ते आपल्या मनाप्रमाणे नाती बनवतात किंवा तोडतात. यांचे खरे व्यक्तित्त्व ओळखणे अत्यंत कठीण आहे.

सिंह : भांडणात या राशीच्या व्यक्ती सर्वात पुढे असतात. जर कोणी या राशीच्या व्यक्तींसोबत भांडण केले तर ते नक्कीच हरतील. या व्यक्ती समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागविण्यात (Manipulate) पटाईत असतात. स्वतः चुकीचे असताना समोरच्याला चुकीचे ठरवण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. याशिवाय, या व्यक्ती कोणाचेही ऐकत नाहीत. आपले काम पूर्ण करण्यासाठी या कधी कधी स्वार्थी होतात.

तूळ : या राशीच्या व्यक्ती समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागविण्यात (Manipulate) हुशार असतात. या व्यक्तींना आपल्यामुळे इतरांना दुखी बघणे आवडत नाही म्हणूनच या व्यक्ती कधी कधी खोटं बोलतात.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of this zodiac sign are good at telling lies be careful pvp