Name Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व व भविष्य याविषयी त्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर सांगते. त्यामुळे नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत; ज्या खूप भाग्यवान आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार काही अक्षरांपासून नाव असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा, खरे प्रेम आणि कोणत्याही कामात नेहमी यश मिळते. ती अक्षरे कोणती? ते जाणून घेऊ या ….

C अक्षर

C या अक्षरापासून नाव असणारे लोक खूप नशीबवान असतात. चांगले नशीब घेऊन हे लोक जन्माला येतात. त्यामुळे त्यांना नेहमी यश मिळते. प्रेमाच्या बाबतीत हे लोक तितकेच ‘लकी’ असतात. त्यांना चांगला जोडीदार मिळतो आणि आयुष्यात भरपूर पैसा कमावण्याची नेहमी संधी मिळते.

25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mesh To Meen Horoscope in Marathi
२४ डिसेंबर पंचांग: बुधाचा ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल मंगलमय; धनलाभ, इच्छापूर्ती ते नात्यात गोडवा; वाचा तुमचा कसा असेल मंगळवार
22nd December Aries To Pisces Horoscope In Marathi
२२ डिसेंबर पंचांग: त्रिपुष्कर योग आज ‘या’ राशींना देईल आनंदवार्ता; भाग्याची साथ, नफा ते प्रेमळ क्षण; तुम्हाला कोणत्या रूपात मिळेल सुख?
Surya and Chandra make Vaidhriti Yog
सूर्य-चंद्र बनवणार अशुभ योग, ‘या’ चार राशीच्या लोकांना घ्यावी काळजी, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
18 December 2024 Horoscope In Marathi
१८ डिसेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला कर्कसह ‘या’ ३ राशींचा सुरु होणार आनंदी काळ, तुम्हाला कोणत्या गोष्टीतून मिळेल लाभ? वाचा राशिभविष्य
People get money and wealth after the age of 35 years
वयाच्या ३५ वर्षानंतर चमकू शकतात ‘या’ लोकांचे नशीब, शनि देवाची दिसून येईल कृपा

D अक्षर

D या अक्षराच्या व्यक्ती खूप कष्टाळू आणि जिद्दी असतात. त्यांच्यासाठी कुटुंब हे सर्वस्व असते. हे लोक नेहमी सर्वांचा आदर करतात. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींवर नेहमी माता सरस्वती आणि लक्ष्मीचा कृपाहस्त असतो. या व्यक्ती वेळेला खूप महत्त्व देतात. त्यामुळे हे लोक आयुष्यात नेहमी खूप यशस्वी होतात.

हेही वाचा : Astrology : रिलेशनशिपमध्ये खूप प्रामाणिक आणि भावनिक असतात ‘या’ तीन राशीचे लोक; तुमच्या पार्टनरचे नाव यात आहे का?

P अक्षर

P या अक्षराचे लोकसुद्धा खूप नशीबवान असतात. त्यांना कोणतीही गोष्ट खूप सहज मिळते. त्यांना अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक जोडीदार मिळतो. या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात भरपूर यश मिळवतात आणि भरपूर पैसा कमवतात.

R अक्षर

R अक्षराचे लोक खूप जास्त प्रामाणिक असतात. लहानपणापासूनच या व्यक्ती सर्वांना प्रिय असतात. ध्येय गाठण्यासाठी या व्यक्ती खूप जास्त मेहनत घेतात. त्यामुळे त्यांना नेहमी यश मिळते. प्रेमाच्या बाबतीत खूप भावनिक असलेल्या या लोकांचे जोडीदारावर खूप प्रेम असते. त्यांच्यावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा असते.

हेही वाचा : Tongue colour Samudrika Shastra : तुमची जीभ कोणत्या रंगाची? जिभेवरून ओळखा माणसाचा स्वभाव

S अक्षर

ज्या व्यक्तींचे नाव S या अक्षरापासून सुरू होते, त्या व्यक्तींचे आयुष्य खूप संघर्षमय असते; पण शेवटी या व्यक्ती यश मिळवतात. हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात. यश मिळवण्यासाठी या व्यक्ती भरपूर मेहनत घेतात. या राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूप जास्त ‘लकी’ असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळते. त्यांना खूप समजून घेणारा जोडीदार मिळतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader