वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीच्या जन्माची वेळ, ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीविषयी माहिती मिळते. याच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या व्यक्तित्त्वाविषयी जाणून घेणे सोपे जाते. आज आपण ‘एस’ म्हणजेच ‘स’ किंवा ‘श’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांच्या व्यक्तित्त्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, एस अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक गुण असतात. हे लोक बोलताना खूप विचार करतात. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक अतिशय संवेदनशील आणि गंभीर असतात. ते आपल्या जोडीदाराचा खूप आदर करतात आणि ते त्यांच्याप्रती खूपच समर्पित मानले जातात. या व्यक्तींचे प्रेमजीवन अतिशय सुखद आणि रोमँटिक असते, असे म्हणतात.

Shani Transit : २०२३ मध्ये वाढणार ‘या’ राशींची चिंता; करावा लागू शकतो शनिच्या साडेसातीचा सामना

या अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींमध्ये उत्कृष्ट नेतृत्त्व कौशल्य असतात. कोणाच्याही हाताखाली काम करणे त्यांना पसंत नाही. त्यांना आपल्या पद्धतीने काम करणे आवडते. तसेच, हे लोक बोलण्यात अतिशय पटाईत असतात. ते खूपच कल्पक आणि बुद्धिमानही असतात. हे लोक प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या मेहनतीने यश मिळवतात.

हे लोक जितके हसमुख आणि मैत्रीपूर्ण असतात, तसाच त्यांना रागही लगेच येतो. मात्र आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे त्यांना चांगले जमते. या व्यक्ती अतिशय स्वाभिमानी असतात आणि त्यांना कोणाचीही मदत घेणे आवडत नाही. मात्र आरोग्याच्या बाबतीत हे लोक कमकुवत मानले जातात. असे म्हणतात, की या अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांना पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, त्यांना त्वचेचे आजार होण्याचीही शक्यता असते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)