सामान्यतः माणसाच्या एका हाताला ५ बोटे असतात. परंतु अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांच्या हाताला किंवा पायाला पाचपेक्षा अधिक बोटे असतात. सहा बोटं असणाऱ्या व्यक्तींना खूपच भाग्यशाली मानले जाते. असे मानले जाते की या व्यक्तींची बुद्धी खूपच तल्लख असते. ज्योतिष आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
हाताला किंवा पायाला सहा बोटं असणं हा काही आजार नाही, हे अत्यंत सामान्य आहे. पण ज्या व्यक्तीच्या हाताला किंवा पायाला सहा बोटं असतात ती व्यक्ती स्वतःच खास बनते. वास्तविक, वैद्यकीय शास्त्र याला एक प्रकारचा विकार मानते, ज्याला पॉलीडॅक्टीली असे नाव देण्यात आले आहे, परंतु ज्योतिषशास्त्र याला निसर्गाची देणगी आणि सौभाग्याचे प्रतीक मानते. जर्मनीतील फ्रीबर्ग विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार सहा बोटे असलेल्या लोकांचा मेंदू वेगवान असतो.
तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये
संशोधनानुसार, १००० पैकी एका व्यक्तीलाला जन्मतःच हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे अतिरिक्त बोट तर्जनी आणि अंगठ्याच्या दरम्यान असते. असे बोट असणारे सुमारे निम्मे लोक याला आजार मानतात आणि शस्त्रक्रियेद्वारे हे सहावे बोट काढतात.
बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या संशोधनानुसार, पॉलीडॅक्टिली सिंड्रोम गर्भाच्या विकासादरम्यान होतो. वास्तविक, गर्भाच्या विकासादरम्यान, हातमोजासारखा आकार तयार होतो, त्यानंतर बोटे आकार घेतात. या प्रक्रियेत काही अडथळे किंवा बदल झाल्यास सहावे बोट तयार होते. बऱ्याच बाबतीत ते अनुवांशिक आहे. म्हणजेच जर कुटुंबातील कोणाला हा सिंड्रोम असेल किंवा जवळचा नातेवाईक या समस्येने ग्रस्त असेल तर त्याची शक्यता अधिक वाढते.
हात किंवा पायाची सहा बोटे असणारे लोक खूप भाग्यवान मानले जातात. असे मानले जाते की अशा लोकांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते आणि ते कोणतेही काम करण्यास सक्षम असतात. असे लोक जास्त नफा कमावणारे असतात, ते कोणतेही काम कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिकपणाने करतात, त्यामुळे यश जवळपास निश्चित असते.
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
हस्तरेषा शास्त्रानुसार जर अतिरिक्त बोट हातातील करंगळीच्या दिशेने असेल तर बुध आणि शुक्र अंगठ्याच्या दिशेने असल्याचे मानले जाते. हे दोन पर्वत हातावर असणे खूप शुभ मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार हाताला अतिरिक्त बोट असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. अशा लोकांची बुद्धी खूप सक्रिय असते. प्राचीन काळी ऋषी-मुनी एकाग्रता वाढवण्यासाठी बोटे आणि अंगठा जोडून ध्यान करत असत, तर सहाव्या बोटाने ते आपोआप होते.
ज्या लोकांच्या हाताला आणि पायाला सहा बोटे असतात, ते चांगले समीक्षकही मानले जातात, पण त्यांच्यात एक दोषही असतो, असे लोक अनेकदा इतरांच्या कामाकडे बारकाईने पाहतात आणि त्यांच्यात दोष शोधतात, कारण अनेकदा त्यांना इतरांचे काम आवडत नाही, त्यामुळे त्यांचे इतर लोकांशी असलेले नाते अनेकदा बिघडते.
स्वप्ना बर्मनच्या पायाला सहा बोटे आहेत, ती एक प्रसिद्ध खेळाडू आहे. २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई खेळांच्या हेप्टॅथलॉनमध्ये तिने प्रथमच भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनच्या हातात सहा बोटे आहेत, त्याने ती अद्याप ते बोट काढलेले नाही. तो बॉलिवूडमधला एक यशस्वी कलाकार मानला जातो. आतापर्यंत त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.