आपल्या हातावर अनेक प्रकारच्या खुणा असतात. हस्तरेखा शास्त्रानुसार यातील काही खुणा शुभ संकेत देतात तर काही अशुभ. हस्तरेखा शास्त्रात ८ प्रकारच्या चिन्हांचे महत्त्व सांगितले गेले आहे. हे शुभ चिन्ह हातावर कोणत्या स्थानावर असेल याला देखील विशेष महत्त्व आहे. हातावरील गुरु पर्वत खास असतो. या पर्वतावर असणारे काही चिन्ह जीवनातील यश दर्शवतात. जाणून घेऊया तळहातावर असलेल्या काही खास खुणा.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हातावरील या खुणा असतात खूपच खास
- हस्तरेषा शास्त्रानुसार हस्तरेखाच्या ८ शुभ चिन्हांपैकी ‘वर्तुळ’ चौथ्या स्थानावर येते. हस्तरेषाशास्त्रात या चिन्हाला सूर्य किंवा कंदुक म्हणतात. या चिन्हाचे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रभाव आहेत.
- हस्तरेषा शास्त्रानुसार जर हातातील वर्तुळाचे चिन्ह गुरू पर्वतावर असेल तर ते खूप शुभ असते. असे लोक खूप भाग्यवान असतात. त्याचबरोबर हे लोक त्यांच्या क्षमतेने उच्च पदे मिळवतात. याशिवाय सासरच्या मंडळींकडूनही त्यांना आर्थिक मदत मिळते.
चुकीच्या सवयींमुळे लागत नाही चांगली झोप; ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून दूर करा समस्या
- तळहातावर शनीच्या पर्वतावर वर्तुळाचे चिन्ह असल्यास अचानक धनप्राप्ती होते. अशा लोकांना बेटिंग किंवा जुगार खेळण्यातही खूप रस असतो.
- हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर सूर्यावर वर्तुळाकार चिन्ह असेल तर व्यक्ती सात्विक आणि विचारांनी शुद्ध असतो. असे लोक आपल्या कर्माने जगात प्रसिद्धी मिळवतात. याशिवाय त्यांना नशिबाची साथही मिळते.
- बुध पर्वतावर वर्तुळाचे चिन्ह असल्यास, लोकांना व्यवसायात भरपूर यश मिळते. असे लोक एक यशस्वी व्यापारी असतात आणि व्यापारात एक खास ओळख निर्माण करतात.
- हस्तरेषा शास्त्रानुसार चंद्राच्या पर्वतावरील वर्तुळ शुभ संकेत देत नाही. अशा स्थितीत व्यक्तीचे आरोग्य कमकुवत राहते. तसेच, अशा लोकांना नदी, पाणी आणि समुद्रामुळे नुकसान होऊ शकते.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)
First published on: 21-03-2022 at 20:41 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People with this mark on their hands become great officers pvp