प्रेमभंग होणं ही खूपच वेदनादायी गोष्ट आहे. प्रेमभंग म्हणजे ब्रेकअपमुळे बऱ्याच जणांच्य मानसिकतेवर गंभीर परिणामही होतात. मात्र काही जणांना प्रेमभंग पचवणं सोपं जातं तर काही जणांना वर्षानुवर्षे हे दुःख पचवता येत नाही. परिणामी, व्यसनं, मानसिक आजार, अनारोग्य अशा अनेक गोष्टींचा सामनाही त्यांना करावा लागतो. याचं एक उदाहरण कबीर सिंग चित्रपटात पाहायला मिळालं.
ज्योतिष शास्त्राच्या बारा राशींच्या माध्यमातून आपल्या स्वभावाविषयी आपल्याला बरेच काही कळू शकते. प्रेमभंग वाईटच पण त्यातून बाहेर न पडणं हे अधिक वाईट. खालील चार राशींच्या व्यक्तींना प्रेमभंग पचवणं फार अवघड जातं आणि त्यामुळे त्यांचाही ‘कबीर सिंग’ होण्याची शक्यता निर्माण होते.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना प्रेमात पडण्यापेक्षा ब्रेकअपच्या वेदनातून बाहेर येण्यास त्यांना अधिक वेळ लागतो. हे लोक दु:खामध्ये पूर्णपणे बुडतात आणि त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या जगात राहू लागतात.
कुंभ : जर कुंभ राशीच्या व्यक्तीचा ब्रेकअप झाला असेल तर त्याला पाठिंब्याची, मदतीची नितांत आवश्यकता असते. ब्रेकअपनंतर हे लोक आठवणींमध्ये इतके गुंतून जातात की स्वत:हून बाहेर पडणे अवघड होते.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेमभावना खूप महत्वाच्या असतात. हे लोक प्रेमाबद्दल जितके गंभीर असतात तितकेच ब्रेकअपनंतरही त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. हे लोक ब्रेकअपनंतर सूड घेण्याचा विचारही करतात.
सिंह : सिंह राशीचे लोक ब्रेकअप हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे असे मानतात. जेव्हा त्यांना असे वाटू लागते की जोडीदाराने त्यांचे कौतुक करणं बंद केलं आहे, त्यांचं महत्त्व कमी होऊ लागलंय तेव्हा हे लोक स्वतःहून त्या नात्यातून बाहेर पडणे पसंत करतात.