People born in October : अंकशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. ऑक्टोबर हा दिनदर्शिकेनुसार वर्षातील दहावा महिना असतो. या महिन्यात खऱ्या अर्थाने हिवाळा सुरू होतो. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असतात. आज आपण ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
- ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांचा लकी नंबर १० असतो. हे लोक खूप नशीबवान असतात. आयुष्यात ज्या गोष्टी मनापासून ठरवतात, त्यात ते यशस्वी होतात. या व्यक्ती खूप मेहनती असतात.
- या लोकांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असते. ते सहज कोणाचेही मन जिंकू शकतात. लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या लिस्टमध्ये टॉपवर येतील. या व्यक्ती आयुष्यात नेहमी सकारात्मक असतात.
- या महिन्यात जन्मणारे लोक जर कुणाच्या प्रेमात पडले तर आपले प्रेम टिकवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. मनापासून ते कोणतेही नातं निभवतात, पण अनेकदा या लोकांना योग्य जोडीदार मिळत नाही.
- या लोकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, ते क्षणोक्षणी भावूक होतात; पण यांना व्यक्त व्हायला आवडत नाही. ते नेहमी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते कधीही सार्वजनिक ठिकाणी राग किंवा संताप व्यक्त करत नाहीत.
- या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप प्रामाणिक असतात. त्यांना खोटं बोलणे आवडत नाही. त्या नेहमी खरेपणासाठी लढतात. खूप जास्त स्पष्ट व्यक्तिमत्त्वाच्या असल्यामुळे त्या नेहमी स्पष्ट बोलतात.
- ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने खूप शांत असतात. त्यांना सतत बडबड करायला आवडत नाही. ते खूप कमी बोलतात. त्यांचा शांत स्वभाव अनेकांना आवडतो. त्यांना विरोधकांपेक्षा मित्र भरपूर असतात.
- त्यांना आयुष्यात नेहमी सकारात्मक राहायला आवडते. त्यामुळे ते कधीही नकारात्मक विचार करत नाहीत आणि त्यांच्याबरोबर नेहमी सकारात्मक गोष्टी घडतात. या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो. ते नेहमी इतरांना पुढे जाण्यास मदत करतात.
- या लोकांना वर्तमानात जगायला आवडते. ते भविष्याचा खूप विचार करत नाही. ते परिस्थितीनुसार वागतात, त्यामुळे अनेकदा या स्वभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
- हे लोक खूप समजूतदार असले तरी पैशांच्या बाबतीत यांचे नियोजन चांगले नसते. ते नेहमी गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करतात. यामुळे अनेकदा यांचे आर्थिक नियोजन बिघडते. या लोकांना पैशांची बचत करता येत नाही.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)