Personality Traits : ज्योतिषशास्त्रात जन्मतारखेला खूप महत्त्व आहे.कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता आणि मानसिकतेविषयी बरंच काही सांगत असते. आपल्या जन्मतारखेचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो.अंकशास्त्रानुसार प्रत्येक संख्येचा व्यक्तिवर प्रभाव पडतो. संख्या किंवा आकड्यांचा सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम व्यक्तिवर दिसून येतात. आज आपण अशा लोकांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांची जन्मतारीख ३, १२, २१, ३० आहे. या लोकांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व कसे असतात, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेले लोकांचा जीवन अंक ३ असतो. या तारखांची बेरीज केली तर ३ येते. या तारखांना जन्मलेले लोक अभ्यासू, समजूतदार असतात. ते सूर्यासारखे तेजस्वी, नीती जपणारे, शिस्तप्रिय, व्यावहारिक आणि महत्त्वाकांक्षी असतात. ते इतरांना नेहमी निस्वार्थी भावनेने मदत करतात. ते नेहमी मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना एवढंच काय तर गरजेच्या वेळी शत्रूंनाही मार्गदर्शन करतात. जर एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर मनात राग धरून ठेवतात.
हेही वाचा : Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेले लोक कधीही समाधानी नसतात. ते महत्त्वकांक्षी असतात आणि त्यांची ध्येय साध्य करण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात.त्यांना नेतृत्व करायला आवडते.अनेकदा ते स्वत:च्या नियंत्रणात अनेक गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
या तारखेला जन्मलेले लोक चांगला नेता बनवू शकतात. त्यांच्याकडे नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उच्च पदावर जाण्याची क्षमता असते. ते कोणतीही जबाबदारी सहज स्वीकारू शकतात. लोकांनी त्यांचे ऐकावे म्हणून या लोकांकडे एक वेगळा आकर्षक अंदाज असतो पण अनेकदा त्यांचा अहंकारी स्वभाव दिसून येतो. या लोकांकडे शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असते.
३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या लोकांना कोणाबरोबरही भांडायला आवडत नाही पण अनेकदा बोलताना त्यांचा हुकूमशाही आणि हट्टी स्वभाव दिसून येतो.अनेकदा लोकांना यांचे विचार पटत असेल पण एखादी गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत आवडू शकत नाही.हे लोक पैसे आणि आर्थिक बाबींमध्ये खूप चांगले असतात. हे लोक व्यवसाय, बँकिंग, वित्त क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. या लोकांना ९ ते ५ नोकरी करायला आवडत नाही आणि नोकरी करताना त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. या लोकांनी सरकारी नोकरी, सामाजिक संस्था, विद्यापिठ, शाळा आणि वित्तीय संस्थांमध्ये काम केल्यास प्रगती होऊ शकते. हे लोक चित्रकला, लेखन, कायदा, राजकारण, इत्यादी क्षेत्रात करिअर करू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)