Pisces Horoscope Astrology Today:  २८ जानेवारी ही पौष कृष्ण पक्षाची चतुर्दशी आणि मंगळवार आहे. ही चतुर्दशी मंगळवारी संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल. तर रात्री ११.५१ मिनिटांपर्यंत वज्र योग असेल, तसेच सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत पूर्वाषाधा नक्षत्र जागृत असेल त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र दिसेल, या दिवशी सकाळी ७.०२ मिनिटांनी शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मंगळवारचा शुक्राचा मीन राशीतील प्रवेश मीन राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकतो का? या विषयी जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस ( How Will Today Be Pisces People?)

वैद्यकीय व्यवसायातील लोकांना आजच्या दिवशी चांगला लाभ होईल. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी विशेष अधिकार तुमच्या हातात येतील. अनेक कामांत तुम्हाला घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकते.

मीन राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Pisces Finance Horoscope Today)

अतिरिक्त खर्च होऊ शकतो. पण आर्थिक स्थितीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून असलेले टेन्शन दूर होऊ शकते. भागीदारीत केलेले काम तुम्हाला चांगला फायदा मिळवून देऊ शकते. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल.

तूळ राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Pisces Career Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनी रोजच्या कामातून थोडी विश्रांती घ्या. कोणत्याही गोष्टींचा जास्त विचार करु नका, स्वत:साठी जास्त वेळ द्या आणि मनातील अनेक गोष्टी क्लिअर करा. तुम्हाला करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी चालून येतील.

मीन राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions Pisces Love Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदात जाऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांना काही सल्ला दिल्यास तो ऐकण्याचा प्रयत्न करा. परस्पर प्रेम आणि सहकार्याची भावना तुमच्या मनात कायम राहील. मुलांकडून तुम्हाला आनंदाची गोष्ट ऐकायला मिळू शकते.