सोनल चितळे

Pisces Yearly Astrology Prediction 2025 : मीन ही गुरूची रास आहे. उदार, परोपकार, स्वार्थत्याग हे गुरूचे उदात्त गुणधर्म मीन राशींच्या व्यक्तींमध्ये प्रकर्षाने दिसून येतात. मीन रास रूढीप्रिय असते. मीन राशी सदा हसतमुख आणि कलेचे उपासक असतात. स्वभाव काहीसा चंचल असतो. एकटे एकटे राहण्यापेक्षा घोळक्यात, समूहाने राहणे तुम्ही पसंत करता. सारासार विचार करण्याचे शहाणपण तुमच्यात आहे. महत्त्वाचे निर्णय तुम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही. कोणावर तरी विसंबून असणे हा आपला स्थायीभाव आहे. काही वेळा आळशीपणादेखील तुमच्यात दिसून येतो. तर, अशा या मीन राशीला २०२५ हे नूतन वर्ष कसे असेल ते पाहू…

मीन राशीच्या दृष्टीने वर्षातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे असतील… १८ मार्चला हर्षल तृतीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करील. त्यामुळे हुरूप, उत्साह वाढेल. २९ मार्चला शनी आपल्या मीन राशीत प्रवेश करेल. साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल. अडचणींवर मात करत करत पुढे जाल. १४ मे रोजी गुरू चतुर्थातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. महत्त्वाच्या गोष्टी विलंबाने पूर्ण होतील. २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने अनुक्रमे व्ययातील कुंभ राशीत आणि षष्ठातील सिंह राशीत प्रवेश करतील.

Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
a unique sanyog created on paush Purnima after 144 years
१४४ वर्षानंतर पौष पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा दुर्लभ संयोग, या चार राशींवर पडणार पैशांचा पाऊस

जानेवारी (January Horoscope 2025)

नव्या उत्साहाने नववर्षाचे स्वागत कराल. नव्या योजना, नवे प्रकल्प कार्यान्वित होतील. व्यक्तिमत्त्वाचे नवे आयाम विकसित कराल. विद्यार्थ्यांना कसून मेहनत घ्यावी लागेल. गुरुबल चांगले असल्याने या मेहनतीचे चीज होईल. मकर संक्रांत विशेष फलदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात आपली बाजू ठामपणे मांडाल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाह योग सुरू आहेत. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखकारक वाटेल. लहान-मोठे वाद तिथल्या तिथे मिटवण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार वाटेल. प्रॉपर्टीसंबंधित कामे पुढे ढकलावीत. गुंतवणूकदारांसाठी ग्रहमान सुधारत आहे. आशावादी दिवस आहेत. मिश्र हवामानामुळे पित्त व कफाचा त्रास वाढेल. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

फेब्रुवारी (February Horoscope 2025)

साडेसातीमुळे येणारे अडथळे चांगल्या गुरुबलामुळे पार करू शकाल. शब्दांचा वापर सावधपणे करावा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतील. आजूबाजूची प्रलोभने त्यांचे मन विचलित करतील. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग आहे. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. विवाहित दाम्पत्यांमध्ये वैचारिक मतभेद होतील. जोडीदाराचा मुद्दा नीट समजून घ्यावा. शब्दाने शब्द न वाढवता, शांत राहणे दोघांच्या हिताचे ठरेल. प्रॉपर्टीचे कामकाज पुढे सरकेल. महाशिवरात्रीदरम्यान तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला लाभकारक ठरेल. गुंतवणूक करताना फसव्या आवाहनांना भुलू नका. दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायद्याची असेल. झटपट मिळणाऱ्या पैशामागे धावणे धोक्याचे आहे. सांधे, स्नायू आखडतील. त्यामुळे व्यायाम आवश्यक आहे!

हेही वाचा…Capricorn Yearly Horoscope 2025: मकर राशीला वर्षभर गुरुची साथ! धनलाभासह शिक्षण, नोकरीत होतील मोठे बदल; सोनल चितळेंनी सांगितले १२ महिन्यांचे भविष्य

मार्च (March Horoscope 2025)

कष्ट केलेत, तर फळ नक्की मिळेल ही शिकवण देणारा हा महिना असेल. नातेवाईक, मित्रमंडळी मदतीसाठी पुढे येतील. विद्यार्थी परीक्षेच्या आधी उत्तम सराव करतील. अनेक अडचणींतून अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. कौटुंबिक वातावरणाचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका. नोकरी-व्यवसायात आहे तशीच स्थिती राहील. धीर सोडू नका. १८ मार्चला हर्षल तृतीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. रंगपंचमीचे रंग आर्थिक लाभ देणारे आहेत. २९ मार्चला शनी आपल्या मीन राशीत प्रवेश करेल. साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल. गुढीपाडवा आशेचे किरण घेऊन येईल. कष्टाचे चीज होईल. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम घेणे हिताचे नाही. घर, इस्टेट यांबाबत निर्णय घेताना घाई न करता, संबंधितांनी साकल्याने चर्चा करावी. डोळे कोरडे होणे, लाल होणे चुरचुरणे असे त्रास होतील.

एप्रिल (April Horoscope 2025)

विचार अमलात आणणे आणि त्याचा सर्वांना लाभ होणे यांमुळे आपणास समाधान मिळेल. विद्यार्थिवर्ग नव्या जोमाने अभ्यास करेल. कला, क्रीडा, स्पर्धात्मक परीक्षा यांत सहभागी होईल. साडेसातीच्या काळात घेतलेली मेहनत फळास येईल. भले विलंब होईल; पण कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात मांडलेली आत्मविश्वासपूर्वक विधाने आपणास मान मिळवून देतील. विवाहोत्सुकांना आपल्या जोडीदाराची निवड करता येईल. विवाहित मंडळींनी एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करू नये. प्रत्येकाच्या कामाचे गणित वेगळे असते. घराची खरेदी वा विक्री करताना कागदपत्रे तपासून बघावीत. कायद्याचे उल्लंघन टाळा. गुंतवणूकदारांच्या लाभात घट होईल. अक्षय्य तृतीया आरोग्यकारक असेल. पथ्य, व्यायाम व आहाराचे महत्त्व जाणवेल.

मे (May Horoscope 2025)

वेगवेगळ्या प्रकारची कामे, जबाबदाऱ्या यांमुळे डोके भंडावून जाईल. कामाची वर्गवारी आणि वेळेचे नियोजन केल्यास गोष्टी सुलभ होतील. बुद्ध पौर्णिमेच्या आसपास द्विधा मन:स्थिती होईल. विद्यार्थी उच्च शिक्षणासंबंधित प्रवेश परीक्षांची तयारी करतील. १४ मे रोजी गुरू चतुर्थ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करील. गुरुबल कमजोर होईल. लहान-मोठ्या गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी- व्यवसायात नव्या संधी दिसत असूनही त्या स्वीकारता येणार नाहीत. २९ मे रोजी राहू व केतू वक्र गतीने अनुक्रमे व्यय स्थानातील कुंभ राशीत व षष्ठ स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील. आवक-जावक यांचा मेळ घालताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखकर वाटेल. गुंतवणूकदारांनी भलते धाडस दाखवू नये. उष्णता व हवेतील प्रदूषणामुळे घसा खवखवणे, लाल होणे अशा तक्रारी सतावतील.

जून (June Horoscope 2025)

अनुभव हा आपला सर्वोत्तम गुरू असतो या न्यायाने हा महिना आपणास अनेक धडे देणार आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. भोवतालची प्रलोभने अधिक प्रभावी ठरतील. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे एकाग्रता वाढवाल. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे बदल घडतील. सहकारीवर्गाकडून फारशा सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. स्वतःहून घेतलेली जबाबदारी हिमतीने पूर्ण करून दाखवाल. वटपौर्णिमा भाग्यकारक बातमी देईल. संधीचे सोने करणे आपल्या हातात असेल. घर, इस्टेट यांबाबत निर्णय घेताना ठाम राहणे गरजेचे आहे. मनाची द्विधा स्थिती होऊन चालणार नाही. गुंतवणूकदारांनी आधीच्या अनुभवातून शहाणे व्हावे. न झेपणारी जोखीम टाळा. संमिश्र हवामान व वायुप्रदूषणामुळे उष्णतेचे, श्वसनाचे त्रास बळावतील.

हेही वाचा…Sagittarius Yearly Horoscope 2025 : धनु राशीच्या आयुष्याचे होणार सोने! आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामे होतील पूर्ण; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य

जुलै (July Horoscope 2025)

नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. आषाढी एकादशी भाग्याची दिंडी घेऊन येईल. विद्यार्थिवर्ग प्रयत्नांची पराकाष्ठा करील. नवा अभ्यासक्रम, नवा विषय आत्मसात करण्यासाठी शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन घ्यावे लागेल. गुरुपौर्णिमा फलदायी ठरेल. नोकरी व्यवसायात नवे प्रयोग न करता, आहे तेच कामकाज नीट सांभाळाल. हितशत्रूंचा त्रास वाढेल; पण धीर खचू देऊ नका. गुरुबल कमजोर असल्याने विवाह योग लांबणीवर जातील. विवाहित दाम्पत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात भरारी घेताना कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. घराचे निर्णय अनुत्तरित राहतील. कोर्टाचा निकाल रखडेल. गुंतवणूक करताना सत्यता आणि सुरक्षितता यांची पडताळणी करून घ्यावी. फायदा कमी झाला तरी हरकत नाही; पण तोटा अजिबात होऊ देऊ नका. पोटाची काळजी घ्यावी. उलट्या होणे, अपचन होणे, असे त्रास डॉक्टरी उपायांनी दूर कराल.

ऑगस्ट (August Horoscope 2025)

कमजोर गुरुबल व साडेसाती असूनदेखील हा महिना उत्साहवर्धक असेल. नव्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडाल. सामाजिक बंध दृढ होतील. विद्यार्थिवर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, प्रात्यक्षिके यांत मग्न असेल. नारळी पौर्णिमा ते जन्माष्टमी यादरम्यान अपेक्षित बातमी समजेल. नोकरी-व्यवसायात नव्या व्यक्तींच्या भेटीगाठी हितकर ठरतील. विवाहोत्सुकांना अजून थोडी वाट बघणे क्रमप्राप्त आहे. विवाहित मंडळींनी लहान-मोठ्या मुद्द्यावरून वाद घालणे योग्य नाही. जोडीदाराचे म्हणणे नीट ऐकून घेतलेत तरी त्याला खूप दिलासा वाटेल. श्री गणेशाचे आगमन उमेद जागवेल. जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी भविष्यात लाभदायी ठरेल. गुंतवणूकदारांचा आलेख डळमळीत होईल. अस्थिरता वाढेल. अशा परिस्थितीत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरणार नाही. उत्साहाच्या भरात केलेल्या अतिश्रमाचा शीण जाणवेल.

सप्टेंबर (September Horoscope 2025)

कळत-नकळत हातून चांगल्या गोष्टी होतील. गरजूंना मदत करण्यात समाधान वाटेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अनेक अडथळे पार करून ध्येय गाठणे काहीसे जिकिरीचे असेल. पितृपक्षात हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात हितशत्रूंकडे दुर्लक्ष करून आगेकूच केलीत, तरच आपला टिकाव व निभाव लागेल. स्पर्धात्मक दुनियेत खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे गरजेचे आहे. विवाहित मंडळींनी आपल्या जोडीदाराच्या समस्या ओळखाव्यात. दोघांनी मिळून चर्चेतून प्रश्न सोडवावेत. विचारांच्या देवाण-घेवाणीतून प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घटस्थापना ऊर्जादायक ठरेल. प्रॉपर्टीच्या कामाला नवी दिशा मिळेल. गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा! खर्चावर नियंत्रण ठेवाल. हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून सर्दी-खोकला त्रास देईल.

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

दसऱ्याला आपला उत्साह काही औरच असेल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. सामाजिक कार्य आवडीने कराल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या तयारीचा अंदाज घेऊन आणखी मेहनत घ्यावी लागेल. वेळापत्रकात त्यानुसार बदल कराल. १८ ऑक्टोबरला गुरू पंचमातील कर्क राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. नोकरी-व्यवसायातील अडचणीतून मार्ग निघतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. विवाहितांना दिवाळीत आनंद वार्ता समजतील. जोडीदाराच्या उन्नतीमुळे कुटुंबात उत्साही वातावरण असेल. घर, जमीन, प्रॉपर्टी यांबाबत वारसदारांमध्ये भेटीगाठी व चर्चा, विचारविनिमय होतील. बाजाराच्या उतार-चढावाचा बारकाईने अभ्यास कराल आणि मगच गुंतवणूक कराल. तोटा होऊ देणार नाही. उष्णतेमुळे उत्सर्जन संस्थेचे आजार बळावतील. विशेष लक्ष द्यावे.

हेही वाचा…Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

नोव्हेंबर (November Horoscope 2025)

सेवा कराल, तर मेवा खाल, असा अनुभव देणारा हा सुखद महिना असेल. अडचणी, समस्या, विलंब यांतून सुटकेचा श्वास घ्याल. विद्यार्थिवर्गाचा आत्मविश्वास वाढेल. अभ्यासात विशेष रस घ्याल. याचा परिमाण नक्कीच हितावह असेल. नोकरी-व्यवसायाचा व्याप वाढेल. जबाबदारीत भर पडेल. तरीही सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे निभावून न्याल. कामानिमित्त प्रवास कराल. तसेच जोडीदारासह प्रवास योग आहे. सहवास सुखकर असेल. कुटुंबात देव दिवाळी ते चंपाषष्ठी यादरम्यान शुभ वार्ता समजेल. इस्टेटीबाबत बोलणी सकारात्मक होतील. घाई न करता, विचारपूर्वक मत मांडावे. गुंतवणूकदारांना नव्या संधी खुणावतील. पळत्यापाठी न लागता शाश्वत व सुरक्षित गुंतवणूक करावी. रक्तदाब, मधुमेह व पायाची दुखणी आटोक्यात येतील. आहार, विहार, पथ्य आणि व्यायाम यांकडे विशेष लक्ष द्याल.

डिसेंबर (December Horoscope 2025)

श्री दत्त जयंतीला आत्मविश्वासपूर्वक आपला निर्णय जाहीर कराल. ५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल. विद्यार्थी आत्मपरीक्षण करतील. कोणत्या विषयात काय सुधारणा करायला हवी आहे याचा अंदाज घेतील. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. नोकरी-व्यवसायात कामाचा जोर थोडा कमी होईल. कला, क्रीडा, सर्जनशील कामे यांत रस घ्याल. सार्वजनिक उत्सवात सहभागी व्हाल. विवाहित मंडळी जोडीदारासह प्रवास करतील. अडचणींचा सामना करतील. घराचे कागदपत्र , नियम, अटी यांबाबत कायद्याची चौकट मोडू नका. नियमबाह्य सल्ला कोणी देत असेल, तर तो अजिबात स्वीकारू नका. गुंतवणूकदारांना मोठ्या लाभाची आशा आहे. अभ्यासपूर्वक गुंतवणूक करणेच हिताचे आहे. पडणे, जखम होणे, पू होणे यांची शक्यता आहे.

अशा प्रकारे २०२५ या वर्षात शनीच्या साडेसातीचा पहिला व मधला टप्पा असेल. अडचणींतून मार्ग काढत पुढे जाणे याला पर्याय नाही. १४ मेपर्यंत गुरुबल चांगले आणि त्यानंतर कमजोर गुरुबल असेल. महत्त्वाचे टप्पे, कामे १४ मे च्या आधी पूर्ण कराल. शिक्षण, नोकरी, विवाह, संतती आणि परदेशासंबंधित कामे १४ मेच्या आधी मार्गी लागतील. गुंतवणूकदारांनी पै-पै गुंतवताना सावधगिरी बाळगली, तर २०२५ हे वर्ष भरपूर आर्थिक लाभ देणारे असेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडता, आपले पूर्ण वर्ष आनंदी उत्साही असेल.

Story img Loader