Pitru Paksh 2022 Pitru Dosh: भाद्रपद पौर्णिमेपासून पितृ पंधरवड्याला सुरुवात होते, यंदा पितृपक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत असून २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा तब्बल १२ वर्षानंतर १६ दिवसांचा श्राद्ध काळ असणार आहे. असं असलं तरी १७ सप्टेंबरला श्राद्धाचे कार्य होणार नाही. शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की पितृ पक्षात पितरं पृथ्वीवर येतात. यावेळी त्यांचा विधिवत पाहुणचार करून त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करायची असते. मात्र जर का कुटुंबावर पितर म्हणजेच पूर्वज नाराज असतील तर पिंडदानात, श्राध्दकार्यात काही ना काही कारणाने अडथळे निर्माण होतात. इतकंच नव्हे तर तुमच्या कौटुंबिक सुखाला सुद्धा बाधा निर्माण होते. हे पितृदोष ओळखण्यासाठी काही संकेत आपण आज पाहणार आहोत.

Pitru Paksha 2022: पितृ पक्षात कावळाच नव्हे तर ‘या’ रूपातही आशीर्वाद देतात पूर्वज; रिकाम्या हाती माघारी पाठवू नका

Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
Yearly Scorpio Astrology Prediction in 2025
Scorpio Yearly Horoscope 2025 : २०२५ मध्ये वृश्चिक रास करणार स्वतःला सिद्ध! मिळेल मनपसंत जोडीदार; ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या वर्षाचे राशीभविष्य
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार
CM Devendra Fadnavis On Happy New Year 2025
Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

असं म्हणतात ज्या कुटुंबातील पूर्वजांचे मृत्यूपश्चात वर्ष श्राद्ध किंवा अंत्यसंस्कार विधिवत झाले नसतील किंवा त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी ते धडपडत असतात, अशावेळी नकळत त्यांचा कुटुंबातील सदस्यांवरही प्रभाव दिसतो. यामध्ये कोणाला त्रास देणे हा हेतू नसला तरी त्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळं वलय निर्माण होतो ज्याचे संकेत काही समस्यांमधून दिसतात. उदाहरणार्थ..

  • पितृदोष असल्यास मेहनतीला फळ मिळत नाही, तुमचे कष्ट कुठेतरी वाया जात असल्याचे सतत वाटत राहते
  • पूर्वजांच्या नाराजीमुळे घरात नवे पाहुणे येण्यास अडथळा येतो, संतती सुखापासून वंचित राहावे लागू शकते.
  • सतत नकारात्मक व तणावपूर्ण वाटत राहते.
  • वैवाहिक जीवनात सतत क्लेश होऊ शकतात किंवा जर विवाह झाला नसेल तर लग्न जुळण्यातच बाधा निर्माण होऊ शकते.
  • सर्वात मोठा संकेत म्हणजे स्वप्नात येऊन पूर्वज तुम्हाला काही सांगू इच्छितात.

असं म्हणतात जर मृत्यूच्या वेळी पूर्वजांच्या शांतीसाठी काही करायचे राहून गेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी पितृ पक्ष एक संधी आहे. तिथीनुसार तर्पण व पिंडदान करण्यासोबतच गोरगरीब व गरजूंचीही मदत करून पूर्वजांची नाराजी दूर करता येऊ शकते.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

Story img Loader