अनेकजण मनोभावे देवांची पुजा करतात मात्र, अनेकदा त्यांनी केलेल्या पुजेचा लाभ मिळत नसल्याचं ते सांगतात. याच कारण म्हणजे ते जी पुजा, उपसना करतात ती चुकीच्या पद्धतीने करत असण्याची शक्यता आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक देवाची पुजा करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. ते जाणून घेऊन पुजा केली तर त्याचे फळ लगेच मिळते अशी समज आहे. शिवाय लक्ष्मी देवीची उपासना करणाऱ्यांनाही ते करत असलेली उपासनेचे फळ जर मिळत नसेल, तर ते कदाचित चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत असण्याची शक्यता आहे.
लक्ष्मीची कृपा असणाऱ्या लोकांना नेहमी धनलाभ होतो त्यांच्या आयुष्यात धनधान्याची कमतरता नसते, असं हिंदू धर्मात माणलं जातं. शिवाय लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी म्हटलं जातं. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. मात्र, हे उपाय करण्याआधी सर्वात महत्त्वाचे असते ती म्हणजे लक्ष्मी देवीची जागा. देवीचे मंदिर योग्य दिशेला असणं महत्वाचं माणलं जातं.
हेही वाचा- Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण
वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मीची जागा नेमकी कुठे असावी याविषयीच्या अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. तर पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मतानुसार, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवणं गरजेचं असतं. लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती घरात कोणत्या दिशेला लावणे योग्य आहे त्याबाबत जाणून घेऊया.
मूर्तीची योग्य दिशा –
हेही वाचा- ७ जानेवारी पर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शुक्र-शनिची युतीने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे अशुभ आहे. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी जाऊन गरिबी येण्याची शक्यता असते. याशिवाय लक्ष्मी देवीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये असंही सांगितलं जातं. त्याचं कारण असं की, देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल असून ती एका ठिकाणी थांबत नाही, त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावायला हवा असं सांगितलं जात. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावायला हवी, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहू शकते.
एका जागी एकच फोटो –
वास्तुशास्त्रात असंही सांगितलं जातं की, एका ठिकाणी लक्ष्मीचा एकच फोटो किंवा मुर्ती असावी, एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नये. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मुर्ती आणि फोटो लावणं अशुभ असल्याचं माणलं जातं. दरम्यान, घरात असणाऱ्या लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढून, मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला विष्णूची मुर्ती ठेवून पुजा करणं शुभ असल्याचंही सांगितलं जात. या पद्धतीने लक्ष्मी देवीची पूजा कणाऱ्यांना सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभते असंही सांगितलं जाते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)