Vastu Tips: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व दिले गेले आहे. तुळशीला हिंदू धर्मामध्येमध्ये देवता मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो. घराच्या अंगणात हे रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घराबाहेर तुळशीचे रोप असते. यासोबतच तुळशीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्याच्या दृष्टीनेही खूप चांगले आहे. तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे प्रतीक असल्याने, त्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं आपल्या पूर्वजांपासून सांगण्यात आलं आहे. रोज सकाळी स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे, तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर वास्तूमध्ये असे सांगितले आहे की तुळशीच्या रोपासोबतच इतर काही वनस्पती देखील आहेत ज्या आपल्या जीवनात प्रगती घडवून आणतात. तुळशीच्या रोपासोबत या वनस्पती लावल्याने बराच फायदा होतो. तर जाणून घेऊया या वनस्पतींबद्दल.

दातुरा वनस्पती

वास्तूनुसार जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीच्या रोपासह दातुर्‍याचे रोप लावले तर त्यावर भोलेनाथ प्रसन्न होतात. तसंच लोकांना भीतीपासून देखील मुक्तता मिळते. याशिवाय जर कोणाच्या घरात तणाव असेल तर तोही शिवाच्या कृपेने दूर होतो. याचे कारण म्हणजे दातुरा वनस्पती भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही तुळसीसोबत दातूराचे रोप देखील लावले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

शमी वनस्पती

वास्तूनुसार शमीची वनस्पती न्यायाची देवता म्हणजेच शनिदेवाशी संबंधित आहे. त्यामुळे घराच्या दारात शमीचे रोप लावून शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात पैसाही येत राहतो आणि पैशांची कमी कधी जाणवत नाही. त्यामुळे तुळशीच्या रोपासोबत शमीचे रोपही लावणे हे देखील खूप शुभ मानले जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plant these seedlings with basil at home lakshmis grace will remain gps