Powerful Dhan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२३ मध्ये बुध व शुक्र गोचरासह एक पॉवरफुल धन योग तयार होतआहे. १५ फेब्रुवारीला मीन राशीत गोचर करून शुक्र ग्रह राजयोग तयार करत आहे. यानंतर लगेचच बुध ग्रह सुद्धा गोचर करून दुहेरी राजयोग साधणार आहे. याचा प्रभाव राशीचक्रातील सर्व १२ राशींवर दिसून येऊ शकतो पण ४ राशींना सर्वाधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या दोन महिन्यांनी या ४ राशींच्या भाग्यात अमाप पैसे व श्रीमंतीचे योग आहेत. पदोन्नती होऊन आपल्यालाही प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. पॉवरफुल धन राजयोग तयार होऊन कसा व काय फायदा होणार हे आपण पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन (Mithun Zodiac)

पॉवरफुल धनरायोग बनल्याने मिथुन राशीला अमाप धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जेव्हा शुक्र देव आपल्या कुंडलीत गोचर करून कर्म स्थानी उच्च स्थळावर विराजमान होतील तेव्हापासून तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. या ठिकाणी शुक्राची गुरुसह युती होऊन हंस राजयोग तयार होत आहे. यामुळे जानेवारीपासूनच आपल्याला धनलाभ होऊ शकतो पण फेब्रुवारीत अचानक तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवनवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात यामुळे तुमचा भार व पगार दोन्ही वाढू शकतो. अविवाहित मंडळींसाठी येत्या काळात बुध ग्रहाच्या भद्र राजयोगामुळे लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

धनु (Dhanu Zodiac)

पॉवरफुल धन राजयोग आपल्याला आर्थिक स्थितीत लाभदायक ठरू शकतो. वर्षाच्या शेवटी आपल्यावर शनिदेव कृपा करू शकतात , येत्या वर्षात आपल्याला शनीच्या साडेसातीपासून सुद्धा मुक्ती मिळत आहे. परिणामी तुम्हाला येणारे वर्ष प्रचंड फायद्याचे ठरू शकते. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला दुप्पट नफा कमावण्याची संधी आहे. येत्या वर्षात आपल्या भाग्यात नवी कार बाईक खरेदी करण्याचा योग आहे.एप्रिल महिन्याच्या नंतर धनु राशीच्या भाग्यात विवाहयोग तया होत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा धनयोग फायदेशीर ठरू शकतो. शैक्षिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळात पैसे वाचवता येतील.

हे ही वाचा<< २०२३ च्या ‘या’ महिन्यात शनिची साडेसाती संपून धनु राशीला प्रचंड धनलाभाची संधी; नववर्षात आरोग्य व प्रेम देणार का साथ?

कन्या (Kanya Rashi)

धन राजयोग बनल्याने आपल्याला येत्या काळात अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. या काळात आपल्याला भाग्योदय अनुभवता येईल. पद व पैसे दोन्ही कमावण्याची संधी आपल्याला मिळू शकते. तुमच्या भाग्यात येत्या वर्षात विमान प्रवासाचे योग आहेत. जर आपण मीडिया क्षेत्राशी संबंधित व्यवसायात असाल तर तुम्हाला प्रचंड धनलाभ व प्रसिद्धी देणारा हा काळ ठरू शकतो.

हे ही वाचा<< नवीन वर्ष सुरू होताच ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? शनिदेव देणार प्रचंड पैसा कमावण्याची संधी

मकर (Makar Zodiac)

धन राजयोग मकर राशीसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.मागील वर्षात ज्या कारणाने आपले नुकसान झाले होते त्याच मार्गातून हुशारीने पैसे कमवण्याची ही संधी आहे. मकर राशीच्या अशा व्यक्ती ज्या शनीच्या प्रभावाशी संबंधित काम करतात (जसे की तेल, खनिजे, पेट्रोलियम संबंधित व्यवसाय) त्यांना येत्या काळात धनलाभ होऊ शकतो. पैसे गुंतवताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful dhan rajyog can make these zodiac sign very rich can get more money in 2023 according to astrology svs