Guru Gochar In Ashwini Nakshtra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एक महत्त्व आहे. गुरु बृहस्पतीचे गोचर हे सर्वच राशींसाठी शुभ मानले जाते. गुरु हा सुख, सौभाग्य,यश , धन, वैभव व बुद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या राशीत गुरुची स्थिती मजबूत होईल त्या राशीला सुख- समृद्धी व धनप्राप्ती होण्याची संधी असते असे मानले जाते. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह सकाळी ३ वाजून ३३ मिनिटांनी अश्विनी नक्षत्रात प्रथम स्थानी प्रवेश घेतला आहे. गुरूचा आश्विनी नक्षत्रातील प्रभाव हा चार टप्प्यात होणार आहे आणि या प्रत्येक टप्प्यात काही राशींना प्रचंड धनलाभ व प्रगतीचे योग आहेत. नक्की तुमच्या राशीचा भाग्योदय कधी होणार आहे हे पाहूया..
गुरु गोचर प्रथम- द्वितीय टप्पा
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार गुरु गोचरानंतर पहिल्या टप्प्यात मेष, मकर, मिथुन, धनु राशीला लाभदायक स्थिती अनुभवता येणार आहे. या मंडळींना वैवाहिक आयुष्यात समृद्धी प्राप्त होऊ शकते. आता ६ मे २०२३ ते २१ मे २०२३ पर्यंत गुरु गोचराचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. याकाळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊन तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झळाळी मिळू शकते. तुम्हाला आव्हान व प्रॉपर्टीच्या खरेदीचे योग आहेत. तुमच्या प्रचंड कामात येणारी काही लोकं संपर्कात येणार आहेत. तुमचे चरित्र जपून ठेवा, हव्यासाच्यापोटी काही चुकीचे निर्णय घ्यावे लागू शकतात पण तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. तुम्हाला संयमाने प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
गुरु गोचर तिसरा टप्पा
गुरु गोचराचा तिसरा टप्पा २० मे ते ४ जून २०२३ पर्यंत असणार आहे. वृषभ, सिंह, तूळ, कर्क या राशीच्या मंडळींसाठी हा टप्पा प्रभावी असणार आहे. यावेळी अनेकजण तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होऊ शकतात. चैनीच्या व राजेशाही थाटाच्या वस्तू व अनुभव तुमच्या कुंडलीत दिसत आहेत. तुमचा व्यासंग वाढू शकतो. व्यावसायिकांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुंडलीमध्ये गुंतवणुकीतून प्रचंड लाभ लिहिलेला आहे.
हे ही वाचा<< आज शुक्र गोचर होताच ३० मे पर्यंत ‘या’ राशींना होणार धनलाभ? कोट्यवधींचे मालक होण्याची संधी येऊ शकते दारी
गुरु गोचर चौथा टप्पा
गुरु गोचराचा शेवटचा व चौथा टप्पा हा ४ जून ते २१ जून २०२३ या काळात असणार आहे. हे गोचर वृश्चिक, कुंभ, मीन राशीला लाभदायक सिद्ध होऊ शकते. तुम्ही भावुक होऊन निर्णय घेणे टाळा. सीए व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना करिअरमध्ये मोठा बदल दिसून येऊ शकतो. तुम्हाला शुल्लक वाटणारी एखादी गोष्ट तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला योगदान देण्याचे योग आहेत, मात्र त्याचा प्रचार करणे टाळा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)