आज प्रबोधिनी एकादशी आहे. प्रबोधिनी एकादशीचे एक व्रत आहे. आषाढ शुक्ल एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेला विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीस जागा होतो. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थानी असे नाव पडले आहे. या दिवशी उपवास, जागरण करून अगस्त्याच्या फुलांनी विष्णूची पूजा करावी असे या व्रताचे विधान आहे, असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.

दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार चतुर्मासात विष्णू झोपी जातात असे जे सांगितले गेले आहे त्याचा शब्दश: अर्थ घ्यावयाचा नाही. “ईश्वर म्हणजे चैतन्य, ते झोपून कसे चालेल ? या चार महिन्यात आकाश अभ्राच्छादित असते. आकाशातील नक्षत्र तारकांचे दर्शन या चार महिन्यात होत नाही एवढाच याचा अर्थ घ्यावयाचा आहे. दुसरी गोष्ट ‘चातुर्मास’ हा शब्द आपण नेहमी बोलतांना वापरतो. तो योग्य नाही. ‘चतुर्मास’ हा शब्द बरोबर आहे,” असं सोमण म्हणाले.

Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Funny Viral Video Of Man
झोपण्याची ही कोणती पद्धत? अंथरूण घालून असा झोपी गेला की…; लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं, VIRAL VIDEO पाहून येईल हसू
devendra fadnavis 3.0 cm oath (1)
Devendra Fadnavis 3.0: “लहानपणी देवेंद्र बॅटिंग करायचा आणि फिल्डिंग आली की…”, फडणवीसांबद्दल बालपणीच्या मित्रांनी जागवल्या आठवणी!
Naga Chaitanya and Sobhita Dhulipala wedding Allu Arjun, SS Rajamouli to attend guest list revealed
नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर
cyclone fengal normal life in puducherry disrupted by heavy rainfall
‘फेंगल’मुळे पुद्दुचेरीत जनजीवन विस्कळीत; चक्रीवादळाचा वेग मंदावला
Clock
AI-powered Death Clock : तुमचा मृत्यू कधी होणार? कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘डेथ क्लॉक’ देईल उत्तर
Cyclone Fengal has changed weather pattern in state
‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानाचे गणित बदलले

भारतीय पंचांगामध्ये प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील एकादशीला विशिष्ट नावे देण्यात आली आहेत. या प्रत्येक एकादशीसंबंधी कथा सांगण्यात आलेल्या आहेत . ‘एकादशी माहात्म्य ‘ या ग्रंथामध्ये या सर्व कथा आपणास पहाता येतील.

(१) चैत्र =शुक्ल पक्ष – कामदा एकादशी. कृष्ण पक्ष – वरूथिनी एकादशी.

(२) वैशाख = शुक्ल पक्ष – मोहिनी एकादशी. कृष्ण पक्ष – अपरा एकादशी.

(३) ज्येष्ठ = शुक्ल पक्ष – निर्जला एकादशी. कृष्ण पक्ष – योगिनी एकादशी.

(४) आषाढ = शुक्लपक्ष – देवशयनी एकादशी. कृष्ण पक्ष – कामिका एकादशी.

(५) श्रावण= शुक्ल पक्ष – पुत्रदा एकादशी. कृष्ण पक्ष – अजा एकादशी.

(६) भाद्रपद = शुक्ल पक्ष – परिवर्तिनी एकादशी. कृष्ण पक्ष – इंदिरा अकादशी.

(७) आश्विन = शुक्ल पक्ष – पाशांकुशा एकादशी. कृष्ण पक्ष – रमा एकादशी.

(८) कार्तिक = शुक्ल पक्ष – प्रबोधिनी एकादशी. कृष्ण पक्ष – उत्पत्ती एकादशी.

(९) मार्गशीर्ष = शुक्ल पक्ष – मोक्षदा एकादशी. कृष्ण पक्ष – सफला एकादशी.

(१०) पौष = शुक्ल पक्ष – पुत्रदा एकादशी. कृष्ण पक्ष – षट्तिला एकादशी.

(११) माघ= शुक्ल पक्ष – जया एकादशी. कृष्ण पक्ष – विजया एकादशी.

(१२) फाल्गुन = शुक्ल पक्ष – आमलकी एकादशी. कृष्ण पक्ष – पापमोचनी एकादशी.

एकादशी कथा

सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मुर नावाचा एक राक्षस होता. तो गर्वाने भगवान विष्णूवर चाल करून गेला. भगवान विष्णूनी इतर देवांच्या साहाय्याने मुर राक्षसाशी घनघोर लढाई केली. परंतु त्या बलाढ्य राक्षसापुढे त्याचे काहीच चालत नव्हते. अखेरीसस भगवान विष्णू बद्रिकाश्रमी एका गुहेमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांना शस्त्रास्त्रांनी सुसज्य अशी एक स्त्री दिसली. मुर राक्षसही विष्णूचा शोध घेत त्या गुहेपाशी आला. परंतु त्या स्त्रीने त्यास ठार मारले. भगवान विष्णू त्या स्त्रीवर प्रसन्न झाले. त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने भगवान विष्णूना वंदन करून सांगितले की, “एकादशीचा उपवास करणाऱ्यांवर तू सदैव प्रसन्न असावं.” त्यावर भगवान विष्णू ‘तथास्तु’ म्हणाले.

उपवास केल्यामुळे ईश्वर उपासना करतांना आपण अधिक एकाग्र होत असतो. हाच उपवास करण्यामागचा मूळ उद्देश असतो. कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला हजारो वारकरी जात असतात. आषाढी- कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेणे यामध्ये सात्त्विक समाधान प्राप्त होत असते. त्यामुळे मनातील वाईट विचारांना, अनिष्ट प्रवृत्तीना आपोआपच दूर ठेवले जाते. कितीतरी लोक गळ्यात तुळशीची माळ घालून आषाढी- कार्तिकीला पंढरपूरची वारी करून वारकरी झाले आहे. त्यामुळे ते व्यसनांपासून मुक्त झालेले आहेत. मनोनिग्रह, मनोसामर्थ्य यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे. प्राचीनकाली आत्ताच्यासारख्या प्रवासी कंपन्या नव्हत्या. केवळ वारीमुळे हा प्रवास घडायचा. दैनंदिन आयुष्यात बदलही व्हायचा. जीवन सुखी व आनंदी रहावयाचे. त्यामुळे पंढरीच्या वारीची ओढ लागलेली असायची. तुम्ही कधी आषाढी किंवा कार्तिकीला पंढरपूरला जाणार्या वारीमध्ये कधी सामील झाला आहांत का? त्या सुंदर, निर्मळ , साध्या जीवनशैलीचा अनुभव घेतला आहे का? मोकळ्या आवाजात “ विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल! “ असा नामघोष कधी केला आहांत का? नसल्यास एकदा तरी वारीत सामील होऊन हा अनुभव घ्याच, असं सोमण सांगतात.

Story img Loader