Mesh To Meen Horoscope in Marathi : २७ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री ११ वाजून ०४ मिनिटांपर्यंत राहील. सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत साध्ययोग जुळून येईल, त्यानंतर शुभ योग राहील. शतभिषा नक्षत्र रात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे . तसेच आज प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे. याशिवाय आज मासिक शिवरात्रीचे सुद्धा असणार आहे. प्रदोष-शिवरात्रि ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले शिवपूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. तर आजचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कसे सुख घेऊन येणार आहे जाणून घेऊया…
२७ मार्च पंचांग व राशिभविष्य:
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd