Mesh To Meen Horoscope : १० एप्रिल २०२४ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत चालेल. १० एप्रिल रोजी प्रदोष व्रत पाळले जाईल. तसेच, गुरुवारी पंचांगानुसार आजच्या दिवशी अनंग त्रयोदशी ही तिथी असणार आहे. १० एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत जागृत असेल. याशिवाय, महावीर जयंती देखील १० एप्रिल रोजी आहे. तर आजच्या दिवशी तुमच्याबरोबर काय शुभ घडणार जाणून घेऊया…
१० एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्ट ता वाढेल. प्रेम सौख्यात भर पडेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त पाने वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नाका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट पाने सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधि उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर