Pune Video : आज महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाली. ते एक समाजसुधारक व थोर विचारवंत होते. त्यांनी समाजातून जातिभेद व अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार आहे, हे त्यांनी पटवून दिले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे पाऊल उचलले. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केले ज्यामध्ये त्यांनी समाजिक समता आणि सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
महात्मा फुले यांचे विचार आजही जगण्यास प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी ११ एप्रिलला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेल्या महात्मा फुले वाडा येथे कार्यक्रम आयोजित केल्या जाते. यंदा त्यांच्या जयंतीनिमित्त दहा हजार किलोची मिसळ बनवत आहे. सध्या या उपक्रमाची पुण्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.
पुणेकरांनो, फुले वाड्यात बनतेय दहा हजार किलो मिसळ
पुण्यातील लोकप्रिय जोगेश्वरी मिसळ क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे दहा हजार किलो मिसळ बनवण्याचा उपक्रम करत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून हा उपक्रम सुरू होणार आहे. सोशल मीडियावर जोगेश्वरी मिसळच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये काही तरुण मंडळी मिसळ बनवताना दिसत आहे आणि हे तरुण “यायलाच लागते..” असे म्हणत येथे भेट देण्याचे आवाहन करत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सांगतो, “एक लाख लोकांचे नियोजन आहे.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)
jogeshwari_misal_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध जोगेश्वरी मिसळ दहा हजार किलो मिसळ बनवण्याचा उपक्रम करत आहेत… आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती…”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या उपक्रमाचे कौतुक केले आहेत.