बहुतेकदा लोक, त्यांच्या हातात पैसे टिकत नाही या कारणामुळे हैराण असतात. जेव्हाही यांच्या हातात पैसे येतात, ते लगेच संपतात. तथापि, महागाईच्या काळात असे होणे समजू शकतो. परंतु अनेक प्रयत्न करूनही जास्तीत जास्त पैसे खर्च होत असतील तर ही विचार करण्यासारखी बाब आहे. असे तर याची अनेक कारणे आहेत. मात्र यातील एक कारण वास्तुदोष देखील असू शकते. म्हणूनच, वायफळ खर्च टाळावेत यासाठी घरामध्ये कशाप्रकारे पैसे ठेवावेत हे जाणून घेऊया.
का होतात वायफळ खर्च ?
वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी पैसे न ठेवल्यास खर्च वाढू लागतात. प्रत्येक वास्तूचे खास महत्त्व असते. अशातच निष्काळजीपणामुळे पैशांच्यासंबंधित समस्या निर्माण होतात. म्हणूनच वास्तू नियमांचे पालन करावे.
रोज रात्री एका विशिष्ट वेळी जाग येणं सामान्य नाही; यामागे दडलेले आहे ‘हे’ विशेष रहस्य
घरामध्ये तिजोरी किंवा पैसे कुठे ठेवावे ?
वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशांसोबत देवांचा संबंध असतो. तसेच, त्यांचे या दिशांमध्ये वास्तव्य असते. अशावेळी पूर्व दिशेला तिजोरी ठेवणे शुभ असते. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उत्तर दिशेलाही तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि वायफळ खर्चांवर चाप बसेल.
चुकूनही या दिशेला तिजोरी ठेवू नये
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. यामुळे धनाची हानी होणार नाही परंतु धनामध्ये वाढ देखील होणार नाही. परंतु, पश्चिम दिशेला चुकूनही तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. सोबतच वायफळ खर्च वाढू लागतात.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)