Navpancham Rajyog : अनेकांना असे वाटते की राहु ग्रह फक्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो पण असे अजिबात नाही. राहु हा एक असा ग्रह आहे जो सर्वात शक्तिशाली आहे. जर राहू तुमच्या कुंडलीमध्ये योग्य स्थानी विराजमान असेल तर तुम्हाला गरीबीतून श्रीमंतीत आणू शकतो. तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो. राहुच्या कृपेने धनलाभ होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, २० ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. मंगळ ग्रहाने कर्क राशीमध्ये प्रवेश केल्याने मीन राशीमध्ये विराजमान असलेल्या राहुबरोबर नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. हा नवपचंम योग अनेक राशींसाठी फायद्याचा ठरू शकतो तसेच काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या, मंगळ आणि राहुच्या कृपेने कोणत्या दोन राशींचे नशीब पालटणार आहे.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या धन भावामध्ये मंगळ गोचर करणार आहे तसेच राहु या राशीच्या कुंडलीमध्ये अत्यंत शक्तिशाली स्थानावर विराजमान आहे. शनि उत्तराभाद्र नक्षत्रामध्ये विराजमान आहे. अशात राहुला शनि आणि मंगळचे बळ मिळत आहे. त्यामुळे या लोकांना करिअरमध्ये भरपूर लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये मोठा बदल दिसू शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ अवश्य मिळेल. या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल दिसू शकतो. कामाच्या ठिकाणी होणारे बदल स्वीकारावे त्याचा या लोकांना पुढे लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात खूप लाभ मिळू शकतो.

जीवनात भरपूर आनंद दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळेन. पैसे कमावण्याचे स्त्रोत वाढतील. पैशांच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणी दूर होतील. उसणे दिलेले पैसे परत मिळेन.

कन्या राशी (Kanya Zodiac)

राहु सातव्या आणि मंगळ अकराव्या स्थानावर गोचर करत आहे. अशात या राशीच्या लोकांवर राहुची विशेष कृपा दिसून येईल. राहु मित्र शनिच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे मंगळबरोबर नवपंचम योग निर्माण करत आहे.

राहु खूप शक्तिशाली आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेन. सातव्या स्थानी राहु असल्यामुळे वैवाहिक आयुष्यात चांगला परिणाम दिसून येईल. वैवाहिक जीवनात भरपूर आनंद मिळू शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचा योग जुळून येईल. या लोकांच्या अडचणी दूर होतील.

हेही वाचा : Lakshmi Puja 2024 : लक्ष्मीपूजन कसे करावे? घरी व कामाच्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? जाणून घ्या सविस्तर

या लोकांमध्ये थोडा बदल दिसून येईल. या लोकांना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. पैशांचे नवीन स्त्रोत मिळतील. व्यवसाय नोकरीमध्ये आर्थिक वृद्धी होईल. व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि भरपूर नफा मिळेन.