शनिवार २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात चंद्र ग्रह राहू आणि गुरू सोबत मेष राशीत असतील. याशिवाय सूर्य, बुध आणि मंगळ केतूसोबत असतील. ज्योतिषशास्त्राच्या मते, या चंद्रग्रहणाला शुभ योग जुळून आल्याने काही राशींना याचा विशेष फायदा होऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींना होणार फायदा?
मिथुन राशी
या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकतो. आर्थिक फायदासोबतच या राशीतील लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकतो. या काळात रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्या राशीतील लोकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जे लोक सरकारी नोकरीच्या तयारीत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. व्यावसायिकांना नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीची संधी मिळू शकते.
(हे ही वाचा : मंगळदेवाचं तूळ राशीत प्रवेश; २० दिवस वृषभसह ‘या’ ३ राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा? पाहा तुमची रास आहे का यात?)
तूळ राशी
तूळ राशी राशीसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना लोकांना फायदा होऊ शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. चांगल्या पॅकेजसह नवीन कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कार्यक्षेत्रात चांगलं यश मिळून तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते. कामातून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)